देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत या 10 जिल्ह्यांत; महाराष्ट्रात आहेत 2 हॉटस्पॉट

देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत या 10 जिल्ह्यांत; महाराष्ट्रात आहेत 2 हॉटस्पॉट

देशातील 30 टक्के कोरोनाचे रुग्ण हे 10 जिल्ह्यात असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 07 एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन कऱण्यात आलं आहे. हे लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्यानं हे थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका अभ्यासानुसार देशातील 30 टक्के कोरोनाचे रुग्ण हे 10 जिल्ह्यात असल्याचं समोर आलं आहे. यातील दोन तर महाराष्ट्रातच आहेत.

देशातमध्ये राज्यांची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र, दिल्ली, केरळ या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे. सर्वाधिक वेगानं कोरोना रुग्णांची संख्या वाढणाऱ्या राज्यांत दिल्ली आघाडीवर आहे. दिल्लीत आतापर्यंतचं प्रमाण 31.7 टक्के तर आंध्र प्रदेशचं प्रमाण 20 टक्के आहेत. त्याखालोखाल 11.9 टक्के राजस्थान तर तेलंगणात 12 टक्के आहे. हेच महाराष्ट्रात 4.4 टक्के इतकं आहे. दिल्लीत तबलीगी जमात प्रकरणानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाली.

देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याखालोखाल तामिळनाडु आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. याशिवाय देशातील जिल्ह्यांची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यावरून देशातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के रुग्ण हे 10 जिल्ह्यात असल्याचं समोर आलं आहे. त्या दहामध्ये महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

हे वाचा : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 पार; मुंबईच्या हॉटस्पॉटमध्ये कहर, 5 मृत्यू

सर्वाधिक रुग्णांची संख्या साउथ दिल्लीत आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील मुंबईत कोरोनाचे रुग्ण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर केरळमधील कसारगोड हा जिल्हा आहे. चौथ्या क्रमांकावर हैदराबाद असून पाचव्या क्रमांकावर मध्य प्रदेशातील इंदौर आहे. सर्वाधिक रुग्णांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असेललं राज्य तामिळनाडुच्या चेन्नईचाही दहा जिल्ह्यांमध्ये समावेश आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पुण्याचा समावेश आहे. महाराष्ट्रात आधी पुण्यातच कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर कर्नाटकातील बेंगळुरू आणि उत्तर प्रदेशातील जीबी नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. दहाव्या क्रमांकावर राजस्थानमधील जयपूर आहे.

हे वाचा : BMC चा मोठा निर्णय, मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात भाजी विकण्यास निर्बंध

मुंबई देशात सर्वांत मोठा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. मंगळवारी दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार फक्त मुंबई परिसरातच 116 रुग्ण दाखल झाले. ठाण्यात 2 रुग्ण सापडले. याशिवाय 5 रुग्णांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. राज्यातील रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण मुंबईतच आहेत. मुंबईत आतापर्यंत 590 रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1018 वर पोहोचली आहे.

हे वाचा : संतापजनक : हा काय माणूस आहे का? मुंबईत बाईकस्वार तरुणीवर थुंकला

संपादन - सुरज यादव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2020 09:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading