मराठी बातम्या /बातम्या /देश /TikTok : भारतात वापसीची चिन्हं, मोठं पाऊल उचलण्याची तयारी

TikTok : भारतात वापसीची चिन्हं, मोठं पाऊल उचलण्याची तयारी

बाईटडान्स ही कंपनी TikTok भारतात पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सगळं काही व्यवस्थित झाल्यास, लवकरच तुम्ही पुन्हा एकदा या अॅपचा आनंद घेऊ शकाल.

बाईटडान्स ही कंपनी TikTok भारतात पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सगळं काही व्यवस्थित झाल्यास, लवकरच तुम्ही पुन्हा एकदा या अॅपचा आनंद घेऊ शकाल.

बाईटडान्स ही कंपनी TikTok भारतात पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सगळं काही व्यवस्थित झाल्यास, लवकरच तुम्ही पुन्हा एकदा या अॅपचा आनंद घेऊ शकाल.

दिल्ली 14 फेब्रुवारी : देशात TikTok बॅन झाल्यानंतर अनेकजण नाराज झाले होते. अशात या लोकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. TikTok ची भारतात पुन्हा एकदा वापसी होण्याची चिन्हं दिसत आहेत. बाईटडान्स ही कंपनी या शॉर्ट व्हिडीओ अॅपला (Short Video App) भारतात पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सगळं काही व्यवस्थित झाल्यास, लवकरच तुम्ही पुन्हा एकदा या अॅपचा आनंद घेऊ शकाल.

Bloomberg न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतात लवकरच टिक-टॉकची वापसी होऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, भारतानं या अॅपवर लावलेला बॅन हटवावा यासाठी कंपनी पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यामुळे, Bytedance आपल्या सर्वात लोकप्रिय टिक टॉक अॅपचा भारतीय बिजनेस देशी कंपनी Glance ला विकू शकतं. Glance अॅप भारतीय कंपनी InMobi Group द्वारा संचलित होतं. या कंपनीचं Roposo हे लोकप्रिय अॅपही आहे.

बॅन होण्याआधी भारतात टिक टॉक प्रसिद्धीच्या शिखरावर होतं. त्यामुळे, भारतातील या बॅनमुळं कंपनीटचं मोठं नुकसान झालं. कंपनी भारत सरकारसोबत बातचीत करून हे अॅप पुन्हा एकदा  सुरू करण्यासाठी प्रयत्नात आहे.

भारत सरकारनं गाईडलाईन्सचं उल्लंघन केल्याप्रकरणी टिक टॉकसह 59 चायनिज अॅप जुलै 2020 मध्ये बॅन केली होती. तेव्हापासून भारतात टिक टॉकची टीम तर होती मात्र काहीच काम सुरू नव्हतं. यानंतर अलिकडेच टिक टॉकनं आपल्या 2 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं ज्यानंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.

पुर्ण जगभरात टिक टॉकनं आपली मुळं पसरवली आहेत. भारतात जवळपास 20 कोटी लोक टिक टॉकचा वापर करतात. भारतात टिक टॉक चालवणाऱ्या बाईटडान्स कंपनीचे 7 ऑफिस होते. गुरूग्रामशिवाय मुंबई, हैदराबाद, बंगळुरु आणि चैन्नईमध्येही या कंपनीचं ऑफिस होतं. भारतात बॅन होण्याआधी टिक टॉक गतीनं पुढे जातं होतं. मात्र, बॅन झाल्यानंतर बाईटडान्सला केवळ एका दिवसात तब्बल 3 कोटी 64 लाखाचा फटका बसला होता

First published:

Tags: Tiktok, Tiktok viral video