जाहिरात
मराठी बातम्या / देश / Breaking : कर्नाटकचा सस्पेंस संपला, अखेर मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Breaking : कर्नाटकचा सस्पेंस संपला, अखेर मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Breaking : कर्नाटकचा सस्पेंस संपला, अखेर मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Siddaramaiah New Karnatak CM : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला, यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत देशभरात उत्सुकता होती.

  • -MIN READ Karnataka
  • Last Updated :

बंगळुरू, 17 मे : गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू होती. डीके शिवकुमार की सिद्धरामैया यापैकी कोण कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार, याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे. तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर अनेक सूत्र हलवण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आधीच दिल्लीला पोहोचले. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मात्र तब्येतीचं कारण देत दिल्लीला येणं टाळलं. मी औषधं आणि इंजक्शन घेतली आहेत, त्यामुळे मी दिल्लीला जाऊ शकलो नाही, असं शिवकुमार यांनी न्यूज 18 ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. ED चा ससेमीरा, CCD च्या संस्थापकाच्या मुलाशी लग्न; कर्नाटकचे जायंट किलर डीकेंच्या लेकीचीही मोठी चर्चा शिवकुमार सगळ्यात श्रीमंत आमदार डीके शिवकुमार कर्नाटकचे सगळ्यात श्रीमंत आमदार आहेत. निवडणुकीवेळी फॉर्म भरताना शिवकुमार यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली होती. यानुसार त्यांच्याकडे एकूण 1,413 कोटी रुपये आहेत. यामध्ये बँक खाती, जमीन, बॉण्ड्स, प्लॉट, सोनं, हिऱ्यांचे दागिने यांचा समावेश आहे. याशिवाय शिवकुमार यांच्याकडे लक्झरी गाड्याही आहेत. शिवकुमार यांच्या नेटवर्थमध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये 68 टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवकुमार यांनी 2018 साली त्यांची संपत्ती 840 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा 2013 च्या तुलनेत ही संपत्ती दुप्पट वाढली होती.

News18लोकमत
News18लोकमत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाचे मोठे श्रेय काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रे’ला दिले आहे. ‘भारत जोडो यात्रा विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या द्वंद्वात राहुल गांधींनी काढलेली पदयात्रा ‘स्पष्ट विजयी’ ठरल्याचे पक्षाने म्हटले आहे. ‘भारत जोडो यात्रा’ पार पडलेल्या 20 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसने 15, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) 3 आणि भारतीय जनता पक्षाने 2 जागा जिंकल्या. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत या 20 जागांपैकी काँग्रेसला फक्त 5 जागा मिळाल्या होत्या. कर्नाटकचा विजय काँग्रेसचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. कारण गेल्या वर्षभरात काँग्रेसनं हे दुसरं राज्य भाजपकडून खालसा केलाय. त्यामुळे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कर्नाटकचा विजय फायदेशीर ठरणार का हाच खरा प्रश्न आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात