कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे जायंट किलर ठरणारे काॅग्रेसचे डीके शिवकुमार विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. 2021 मध्ये त्यांच्या मुलीचं थाटामाटात लग्न पार पडलं होतं.
कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांची मुलगी ऐश्वर्या हिचं लग्न CCD चे संस्थापक विजी सिद्धार्थ यांचा मुलगा अमर्त्यसोबत फेब्रुवारी 2021 मध्ये पार पडलं.
डीके शिवकुमार यांची मुलगी ऐश्वर्याचं नाव मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात आलं आहे. 2020 मध्ये ईडीने शिवकुमारसह त्यांच्या मुलीचीही चौकशी केली होती.
निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या अर्जात त्यांनी मुलीच्या नावे 108 कोटींची संपत्ती असल्याची माहिती दिली.