पुढील दोन तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा

पुढील दोन तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा

निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालं आहे

  • Share this:

मुंबई, 3 जून : निसर्ग चक्रीवादळाची दिशा पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या मार्गाने जाणार असल्याची माहिती डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख हवामान संशोधक, पुणे वेधशाळा यांनी दिल्यानंतर मुंबईवरील धोका टळल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. तरीही पुढील दोन तास महाराष्ट्रासाठी आव्हानात्मक असणार आहे. हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

येत्या दोन तासात महाराष्ट्रातील रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात विविध भागांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. IMD ने याबाबत माहिती दिली आहे.

आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ किनारपट्टीला धडकले. वादळ धडकल्यानंतर ताशी 100 ते 120 किलोमीटर चक्रीकार वारे वाहून पाऊस पडत होता. त्यानंतर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या वादळाने मार्ग बदलला व ते पुणे, नाशिक या दिशेने पुढे जात होते. या चक्रीवादळाचा मान्सूनवरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे पुणे वेधशाळेने वर्तवले आहे.

हे वाचा-निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात राज्यात गेला 2 जणांचा बळी, कोट्यवधींचं नुकसान

First published: June 3, 2020, 10:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading