मराठी बातम्या /बातम्या /देश /Shocking! DJ च्या कर्णकर्कश आवाजामुळे अडीच वर्षांच्या लहानग्याचा मृत्यू; परिसरात खळबळ

Shocking! DJ च्या कर्णकर्कश आवाजामुळे अडीच वर्षांच्या लहानग्याचा मृत्यू; परिसरात खळबळ

या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

बिलासपुर, 9 सप्टेंबर : धार्मिक, राजकीय समारंभात होणाऱ्या डीजे (Loud DJ Sound) आणि नाचगाण्याचा मोठा ट्रेंड आहे. याशिवाय आयोजकांना लग्नात हवी तशी मजा येत नाही, असंच दिसतं. या डीजेमुळे एका लहानग्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिलासपुर (Bilaspur) जिल्ह्यात बेनिनगरमध्ये राहणारे कलीम अंसारी यांचा अडीच वर्षांचा मुलगा जन्मापासून प्लास्टिक एनीमिया या आजाराने ग्रस्त होता. वेल्लूरमध्ये मुलावर उपचार सुरू होते. 5 सप्टेंबर रोजीही मुलाला उपचारासाठी वेल्लूरला घेऊन जाण्याची तयारी सुरू होती. (The death of a two and a half year old child due to the DJs hoarse voice)

यादरम्यान 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरच्या दरम्यान त्याच्या भागात धार्मिक यात्रा काढण्यात आली होती. यामध्ये डीजेचा उपयोग करण्यात आला होता. मुलाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, डीजेच्या मोठ्या आवाजामुळे (Child Death of DJ Sound) अमानची प्रकृती बिघडली आणि काही वेळात त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा-Mumbai : ज्या तरुणीला प्रपोज केलं तिच्याच घरी पाठवत होता सेक्स टॉयच्या भेटवस्तू

कुटुंबीयांचा मोठा आरोप

मुलाला गमावले कलीम अंसारी यांच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. येत्या काळात ते आपल्या मुलाच्या नावावर एका फाऊंडेशची तयारी करीत आहे. ज्याअंतर्गत या आजाराच्या लोकांना मदत मिळू शकेल. कलीम अंसारी म्हणाले की, त्यांनी आपल्या मुलाला गमावलं आहे. मात्र पुन्हा डीजेमुळे कोणाच्याही घरात शोककळा पसरू नये हीच आशा आहे.

मुलाच्या मृत्यूच्या काही दिवसंनंतर अमानच्या वडिलांनी बिलासपूरचे कलेक्टर आणि एसपी यांची भेट घेतली. आणि भलामोठा आवाज करणाऱ्या डीजेच्या सिस्टमचं डेसिबल ठरविण्यात यावा. म्हणजे या पुढे अशा घटना घडणार नाही.

First published:

Tags: Chhattisgarh, Death