लंडन, 11 जुलै : यंदाच्या वर्षात कोरोना आणि इतर अनेक नैसर्गिक आपत्तींना लोकांना सामोरे जावं लागत आहे. हे वर्ष क्रीडा जगासह संपूर्ण जगासाठी अडचणींनी भरलेले आहे. यावर्षी बर्याच क्रीडा सेलिब्रिटींनी जगाला निरोप दिला आहे. आता चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.
इंग्लंडचा विश्वचषक जिंकणारा फुटबॉल खेळाडू आणि आयर्लंडचे माजी प्रशिक्षक जॅक चार्लटन यांनी जगाला निरोप दिला. ते 85 वर्षांचे होते. इंग्लंडच्या ईशान्य दिशेस नॉर्थम्बरलँडमध्ये त्याच्या वडिलोपार्जित घरी त्यांचा मृत्यू झाला.
हे वाचा-सामना सुरू होण्याआधीच इंग्लंड-वेस्ट
We are deeply saddened to learn of the passing of former #NUFC manager and England World Cup winner, Jack Charlton at the age of 85.
RIP, Jack. A true legend of the game. ⚫️⚪️ pic.twitter.com/qCouZdltCq
— Newcastle United FC (@NUFC) July 11, 2020
इंडिजच्या खेळाडूंनी टेकले गुडघे
त्यांच्या कुटुंबीयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ते अनेक लोकांचे जवळचे मित्र असण्याबरोबरच एक प्रेमळ पती, वडील, आजोबा होते. त्याच्या विलक्षण जीवनाबद्दल आपण किती अभिमान बाळगतो हे आपण व्यक्त करू शकत नाही. ते एक प्रामाणिक, दयाळू आणि सज्जे व्यक्ती होते. इंग्लंडच्या संघाने ट्विट केले की आम्ही खूप दु: खी आहोत.
हे वाचा-48 खोल्यांच्या महालात राहतो 'प्रिन्स ऑफ कोलकाता', पाहा आलिशान घराचे फोटो
इंग्लंडला बनवलं होतं चॅम्पियन
1966 च्या विश्वचषक फायनलमध्ये वेम्बली स्टेडियमवर अतिरिक्त वेळेनंतर जर्मनीला 4-2 ने हरवून विश्वविजेतेपदी आणणे ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती. त्याचा भाऊ बॉबी चार्लटनसुद्धा या संघात होता. त्यांनी 1965 ते 1970 पर्यंत इंग्लंडसाठी 35 सामने खेळले आणि 1967 मध्ये ते इंग्लंडचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवडले गेले होते.