केरळ, 8 एप्रिल : देशभरात कोरोनाचा हाहाकार उडाला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पी विजयन कोरोनाची पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत अनेक राजकीय व्यक्ती व लोक प्रतिनिधींना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या केरळमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल समोर येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागांसाठी एकाच टप्पात मतदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंट (LDF) या डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता आहे. पी. विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. केरळमध्ये सत्ताधारी डावी आघाडी, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत यंदा पाहायला मिळाली.
हे ही वाचा-कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार देणार 5000 रु.; तुम्हाला करावं लागेल फक्त एक काम
I have been confirmed Covid +ve. Will get treated at the Government Medical College, Kozhikkode. Request those who have been in contact with me recently to go into self observation.
— Pinarayi Vijayan (@vijayanpinarayi) April 8, 2021
केरळचे मुख्यमंक्षी पिनराई विजयन यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली. ते सरकारी रुग्णालयातून कोरोनावर उपचार घेणार असल्याचे सांगितले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी क्वारंटाइन व्हावं असंही त्यांनी आवाहन केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kerala Election