जाहिरात
मराठी बातम्या / देश / मरणाने केली 'थट्टा'! नवजात बालकाचा मृतदेह पिशवीत घेऊन बापाचा दीडशे किलोमीटर प्रवास

मरणाने केली 'थट्टा'! नवजात बालकाचा मृतदेह पिशवीत घेऊन बापाचा दीडशे किलोमीटर प्रवास

मरणाने केली 'थट्टा'!

मरणाने केली 'थट्टा'!

Dindori News : नवजात बालकाचा मृतदेह पिशवीत लपवून बापाने दीडशे किलोमीटर प्रवास केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रुग्णालयाने शववाहिनी उपलब्ध करुन न दिल्याने बापावर ही वेळ आली आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

डिंडोरी, 17 जून : दोन दिवसांपूर्वी पुण्यात शववाहिनीला चालक नसल्याने बापाचा मृतदेह रिक्षातून नेण्याची वेळ मुलावर आली होती. हे प्रकरण ताजे असताना आता आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका न दिल्याने एका असहाय्य बापाने आपल्या नवजात मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन दीडशे किलोमीटर प्रवास केला. डिंडोरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. काय आहे प्रकरण? डिंडोरी जिल्ह्यातील सहजपुरी गावात राहणाऱ्या जमनीबाई यांना 13 जून रोजी प्रसूती वेदना होत असल्याने डिंडोरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रसूतीनंतर नवजात बालकाची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळे त्याला जबलपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दोन दिवसांनी 15 जून रोजी नवजात बालकाचा मृत्यू झाला. पिशवीत गुंडाळला नवजात बालकाचा मृतदेह चिमुकल्याचा मृत्यू आणि पत्नी नुकतीच प्रसूत झाल्याने कुटुंबीयांनी डिडोरी येथे परतण्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली. कुटुंबीयांनी मेडिकल कॉलेज जबलपूर व्यवस्थापनाकडे शववाहिनीची व्यवस्था करण्यासाठी खूप विनवणी केली. मात्र, व्यवस्थापनाला पाझर फुटला नाही. वैद्यकीय महाविद्यालयातून नवजात अर्भकाचा मृतदेह एका ऑटोमध्ये ठेवून कुटुंबीयांनी कसातरी जबलपूर बसस्थानक गाठले. पण तरीही डिंडोरीपर्यंत दीडशे किमीचा प्रवास बाकी होता. वाचा - ‘मला बळजबरीने…’ 8 वर्षांच्या मुलीची खोटी तक्रार, फूड डिलिव्हरी बॉयला मारहाण बसमध्ये बसू देत नसल्याने मृतदेह पिशवीत लपवून ठेवला नवजात बालकाचा मृत्यू, नुकतीच प्रसूत झालेली पत्नी आणि त्यात कडक उष्णता. या सर्व प्रकाराने असहाय्य पित्याने मुलाचा मृतदेह एका पिशवीत ठेवला. कारण दुसरा उपाय नव्हता. मृतदेह पिशवीत लपवून बसमध्ये 150 किलोमीटरचा प्रवास करून रात्री उशिरा डिंडोरी गाठले. मृतदेह पिशवीत ठेवण्याचं कारण विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, मृतदेह पाहून बसचालकाने बसमध्ये बसण्यास नकार दिला. खासगी टॅक्सी भाड्याने घेण्याइतके पैसेही त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी मृतदेह एका पिशवीत लपवून कसातरी बसमध्ये बसवून डिंडोरी गाठले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: dead body
  • First Published :
जाहिरात
जाहिरात