पुणे, 21 जून : राज्यातील अनेक भागातील लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी कोरोनाची संख्या मात्र कमी झालेली नाही. पुण्यातील कोरोनाचा कहर सुरूच असून पुणे शहरात आज कोरोनाचे नवे 675 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 15,679 इतकी झाली आहे. आज दिवसभरात पुण्यात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे कोरोनावर उपचार घेणार्या 171 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत 7,435 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पिंपरी चिंचवड - 37 रुग्ण ग्रामीण भागात - 18 छावणी परिसरात - 20 एकूण बाधित - 15679 आतापर्यंत एकूण मृत्यू - 592 राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला असून आजही रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आज कोरोनाच्या 3870 नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज 1591 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 65 हजार 744 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 7 लाख 73 हजार 865 नमुन्यांपैकी 1 लाख 32 हजार 75 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 6 लाख 66 हजार 719 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 26 हजार 278 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 170 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 69 मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. दरम्यान, भारतातील आजच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 15413 रुग्ण आढळून आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,10,461 वर पोहोचली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,69,451 इतकी आहे. हे वाचा- भारतात कोरोनावर उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजुरी; गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.