मराठी बातम्या /बातम्या /देश /

शिया नेते वसीम रिझवी झाले नारायण सिंह त्यागी, हिंदू धर्मात प्रवेश; वाचा सविस्तर

शिया नेते वसीम रिझवी झाले नारायण सिंह त्यागी, हिंदू धर्मात प्रवेश; वाचा सविस्तर

वादग्रस्त शिया नेते वसीम रिझवी हे आता नारायण सिंह त्यागी झाले आहेत. त्यांनी विधिवत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.

वादग्रस्त शिया नेते वसीम रिझवी हे आता नारायण सिंह त्यागी झाले आहेत. त्यांनी विधिवत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.

वादग्रस्त शिया नेते वसीम रिझवी हे आता नारायण सिंह त्यागी झाले आहेत. त्यांनी विधिवत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.

  • Published by:  desk news

गाझियाबाद, 6 डिसेंबर: उत्तरप्रदेशातील वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि शिया नेते म्हणून प्रसिद्ध असलेले वसीम रिझवी (Wasim Rizvi) यांनी अखेर मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश (Converted to Hinduism) केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुस्लीम धर्मातील काही बाबींवर (Criticism on Muslim religion) जाहीरपणे टीका केल्यानंतर ते मुस्लीम कट्टरपंथियांचं टार्गेट ठरले होते. त्यांनी मुस्लीम धर्म सोडावा, असा दबाव त्यांच्यावर येत होता. आपल्या हत्येचं कारस्थान रचलं जात असल्याचे आरोपही त्यांनी केले होते. मात्र अखेर त्यांनी मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.

विधिवत झाला धर्मप्रवेश

इस्लाममधून बहिष्कृत करण्यात आल्यानंतर विधिवत त्यांचा हिंदू धर्मात प्रवेश करण्यात आला. वसीम रिझवी यांचं नवं नाव आता असणार आहे नारायण सिंह त्यागी. त्याचं गोत्र आहे वत्स. त्यांना रितसर स्नान घालण्यात आलं आणि पंचगव्य उपचार करून त्यांना हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. यावेळी वसीम रिझवी यांनी देवीची पूजा आणि आरती केली.

विरोधानंतर झाला निर्णय

मुस्लीम धर्मातील काही प्रथांवर टीका केल्यानंतर त्यांना धर्मातून बहिष्कृत करण्यात आलं होतं. त्यावेळी आपण कुठल्या धर्मात प्रवेश करायचा, याचा अनेक दिवस विचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र सनातन हिंदू धर्म हा सर्वात पुरातन आणि लोकशाहीवादी असल्याचं आपल्या लक्षात आलं. त्यामुळेच आपण हिंदू धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय़ घेतल्याचं रिझवी यांनी सांगितलं.

हे वाचा- या अनपेक्षित Twist नी प्रेक्षकांना दिला धक्का; 2021 च्या गाजलेल्या tv मोमेंट्स

हिंदू धर्मियांकडून स्वागत

वसीम रिझवी यांना हिंदू धर्मात प्रवेश देणाऱ्या नरसिंहानंद गिरी महाराज यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. आपल्या धर्मात रिझवींचं आपण स्वागत करत असून कुठल्याही आक्रमणापासून किंवा हल्ल्यापासून त्यांचं संरक्षण करण्याचं आश्वासन देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Hindu, Muslim, Political leaders, Politics