मराठी बातम्या /बातम्या /देश /अमित शहांनी शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले...

अमित शहांनी शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले...

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत शिवसेना संपल्याची भाषा करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत शिवसेना संपल्याची भाषा करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत शिवसेना संपल्याची भाषा करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.

मुंबई, 07 फेब्रुवारी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनी शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Mp Sanjay Raut) यांनी नाव न घेता अमित शहांवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक ट्वीट करत शिवसेना संपल्याची भाषा करणाऱ्यांना चपराक मारली आहे. यावेळी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये रजनी पटेल  (Rajani Patel) आणि मुरली देवरा (Murli deora) यांचासोबतच महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chauhan) यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे.

शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, '1975 साली रजनी पटेल यांनी आणि 90 च्या दशकात मुरली देवरा यांनी काही काळातचं शिवसेना पक्ष नामशेष होईल अशी भाषा केली होती. 2012 अशाच प्रकारचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. पण दोन्ही वेळी शिवसेनेने पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने राजकारणात आपलं स्थान भक्कम केलं होतं. जय महाराष्ट्र!'

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना या सरकारची तुलना तीन चाकांशी केली होती. जे वेगवेगळ्या दिशेनं प्रवास करत असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर अमित शहांनी काश्मीर प्रश्न आणि राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेनेने सावध भूमिका घेतल्याचं म्हटलं आहे. शिवाय शिवसेना पक्षाने सावध भूमिका घेत बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा धुळीस मिळवली असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीस नसते तर शिवसेनेचं अस्तित्वही नसतं

कोकणात आलेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरही केंद्रीय गृहमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, कोकणात जेव्हा चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करत होते? ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची राज्याला गरज होती, तेव्हा मुख्यमंत्री साखर कारखान्यातील फायद्याबद्दल चर्चा करण्यात व्यस्त होते. देवेंद्र फडणवीस नसते तर शिवसेनेचं अस्तित्वही नसतं, अशी विखारी टीकाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.

First published:

Tags: Amit Shah, Maharashtra, Sanjay raut