मराठी बातम्या /बातम्या /देश /देशाच्या राजधानीत दणक्यात साजरी होणार शिवजयंती, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

देशाच्या राजधानीत दणक्यात साजरी होणार शिवजयंती, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि संसद भवनाच्या प्रांगणात साजरी करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि संसद भवनाच्या प्रांगणात साजरी करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि संसद भवनाच्या प्रांगणात साजरी करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. ढोल-ताशाच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि संसद भवनाच्या प्रांगणात साजरी करण्यात येणार आहे.

संसद भवनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी गेल्या आठवडाभर सुरू होती. त्यावर अंतिम हात मारल्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. छत्रपती संभाजी राजे यांचे सुपुत्र शहाजीराजे तसंच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह जवळपास 50 कार्यकर्ते संसद भवनात होणाऱ्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

गेल्या पाच वर्षापासून संसद भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जयंतीदिनी माल्ल्यार्पण करण्याचे काम नाशिकचे खासदार हेमंत गोडसे करत आहेत. सोबतच या कार्यक्रमानंतर महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा होणार आहे. बाल शिवाजीचा पाळणा राजधानी दिल्लीतील महिला मंडळातील महिला गाणार असून यासाठी महाराष्ट्र सदनामध्ये सौंदर्यकरण सुरू झालं आहे.

ज्या ठिकाणी बाल शिवाजीचा पाळणा होणार आहे तो संपूर्ण परिसर फुलांनी सजविण्यात येणार असून दरवर्षी शेकडोंच्या संख्येने शिवभक्त महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमात सहभागी होत असतात. मात्र कोरोनाचा काळ असल्यामुळे फक्त दोनशे लोकांनाच महाराष्ट्र सदनात कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे उत्साहात यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. यासाठी फेटे बांधणारे राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. सोबतच महाराष्ट्र सदनामध्ये रांगोळी देखील काढण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी व्हावी असा दिल्लीतील शिवजयंती उत्साह समिती प्रयत्न करत आहे.

First published:

Tags: Chhatrapati shivaji maharaj, Shiv jayanti, Shivaji maharaj, Shivjayanti