मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्ली जळत असताना अमित शहा कुठे आहेत? शिवसेनेची गृहमंत्र्यांवर सडकून टीका

दिल्ली जळत असताना अमित शहा कुठे आहेत? शिवसेनेची गृहमंत्र्यांवर सडकून टीका

'शहा हे गृहमंत्री असतानाही घरोघर प्रचार पत्रके वाटत फिरत होते पण संपूर्ण दिल्लीत हिंसेचा आगडोंब पेटला असताना हेच गृहमंत्री कुठे दिसले नाहीत.'

'शहा हे गृहमंत्री असतानाही घरोघर प्रचार पत्रके वाटत फिरत होते पण संपूर्ण दिल्लीत हिंसेचा आगडोंब पेटला असताना हेच गृहमंत्री कुठे दिसले नाहीत.'

'शहा हे गृहमंत्री असतानाही घरोघर प्रचार पत्रके वाटत फिरत होते पण संपूर्ण दिल्लीत हिंसेचा आगडोंब पेटला असताना हेच गृहमंत्री कुठे दिसले नाहीत.'

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली28 फेब्रुवारी : राजधानी दिल्लीतल्या दंगलीने देशभर वादळ निर्माण झालंय. या दंगलीत 38 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. विरोधी पक्षांनी सरकार विरुद्ध टीकेची झोड उठवलीय. शिवसेनेनेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केलीय. दिल्लीत आगडोंब उसळलाय असं असताने कणखर असणारे गृहमंत्री कुठे आहेत असा सवाल शिवसेनेने 'सामना'मधून केलाय. विधानसभा निवडणुकीत अमित शहांनी दिल्लीतल्या गल्लो गल्लीत फिरून पत्रकं वाटली. त्यावेळी त्यांना वेळ मिळाला. मात्र आता दिल्ली जळत असताना गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत असं अग्रलेखात म्हटलंय. वीर सावरकरांच्या गौरवासाठी जे राजकीय नौटंकी करीत आहेत त्यांनी देशाच्या गौरवाचा विचार करावा. राजधानीतला हिंसेचा धूर देशाला गुदमरून टाकत आहे. त्या धुरात देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत. चिंता वाटावी असा हा प्रकार आहे! अशी टीका अमित शहांवर करण्यात आलीय.

आणखी काय आहे 'सामना'च्या अग्रलेखात

दिल्ली जळत असताना, आक्रोश करीत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते? काय करीत होते? असे प्रश्न विचारले जात आहेत. दिल्लीच्या दंगलीत आतापर्यंत 38 बळी गेले आहेत व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. समजा, केंद्रात काँग्रेस अथवा अन्य आघाडीचे सरकार असते व विरोधी बाकांवर भारतीय जनता पक्षाचे महामंडळ असते तर दंगलीबद्दल गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत मोर्चे व ‘घेराव’चे आयोजन केले असते.

सामना रंगणार...फडणवीसांच्या संकटमोचकाला घेरण्याची शिवसेनेची रणनीती

राष्ट्रपती भवनावर धडक दिली असती. गृहमंत्री अपयशी ठरल्याचे खापर फोडून ‘‘राजीनामा हवाच!’’ असा आग्रह धरला असता, पण आता तसे होणार नाही. कारण भाजप सत्तेत आहे व विरोधी पक्ष कमजोर आहे.देशाला मजबूत गृहमंत्री लाभले आहेत, पण ते दिसले नाहीत याचे आश्चर्य वाटते. विधानसभा निवडणुकीत अमित शहा हे गृहमंत्री असतानाही घरोघर प्रचार पत्रके वाटत फिरत होते व या प्रचार कार्यासाठी त्यांनी भरपूर वेळ काढला होता.

शिक्षक की हैवान? पाण्यात विष कालवून विद्यार्थिनिची केली हत्या

पण संपूर्ण दिल्लीत हिंसेचा आगडोंब पेटला असताना हेच गृहमंत्री कुठे दिसले नाहीत व यावरच विरोधी पक्ष संसदेच्या अधिवेशनात गोंधळ उडवू शकतो. विरोधी पक्षाने दिल्लीतील दंगलीचा प्रश्न उपस्थित केलाच तर त्या सगळ्यांना देशद्रोही ठरवले जाईल काय? हाच प्रश्न आहे.

First published:

Tags: Amit Shah