Home /News /national /

खाकी वर्दीला सलाम! ना कोरोनाची भीती ना लक्षलवाद्यांची; Corona संकटात गरोदर महिला DSP थेट रस्त्यावर

खाकी वर्दीला सलाम! ना कोरोनाची भीती ना लक्षलवाद्यांची; Corona संकटात गरोदर महिला DSP थेट रस्त्यावर

कोरोना संकटात गरोदर महिला पोलीस अधिकारी थेट रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य बजावत आहे. या महिला पोलीस अधिकारीवर सोशल मीडियात कौतुकांचा वर्षाव होत आहे.

    नवी दिल्ली, 20 एप्रिल: कोरोना संकटात (Corona Pandemic) सर्वचजण आपली काळजी घेत आहेत. मात्र, डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनामुळे गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, याच संकटात अशा एक महिला पोलीस अधिकारी आहेत ज्यांच्या कार्याची सध्या सर्वत्र चर्चा होत असून कौतुकही होत आहे. होय, या महिला पोलीस अधिकारी आहेत शिल्पा साहू (DSP Shilpa Sahu), ज्या कोरोनाच्या संकटातही रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य बजावत आहेत. छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात DSP या पदावर शिल्पा साहू कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्या आपल्या लग्नामुळेही चर्चेत आल्या होत्या. लग्नानंतर आपल्या पतीसोबत नक्षल विरोधी अभियानातही त्या सहभागी होत असल्याने त्यांची जोरदार चर्चा होत होती. आता त्या गर्भवती आहेत. मात्र, पाच महिन्यांच्या गर्भवती असतानाही डीएसपी शिल्पा साहू (Pregnant DSP Shilpa Sahu) या कोरोना संकटात आणि भर उन्हात आपल्या घरातून बाहेर पडत रस्त्यावर उभं राहून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. वाचा: Maharashtra Lockdown Update: सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार किराणा मालाची दुकानं, राज्य सरकारचे नवे आदेश कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करा आणि विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन डीएसपी शिल्पा साहू या करताना दिसत आहेत. छत्तीसगड नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. गरोदर असतानाही शिल्पा साहू या ना कोरोनाला घाबरत आहेत नाही नक्षलवाद्यांना घाबरत आहेत. त्या आपले कर्तव्य बजावण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. सोशल मीडियात कौतुकांचा वर्षाव डीएसपी शिल्पा साहू या रस्त्यावर उभ्या राहून नागरिकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. तसेच मास्कचा वापरही करण्यास सांगत आहेत. कडाक्याचे उन असतानाही त्या रस्त्यावर उभ्या राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कार्याचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियातही प्रचंड व्हायरल होत असून त्यावर युजर्स कौतुकांचा वर्षाव करताना दिसत आहेत. ट्रेनिंग दरम्यान झाली होती भेट शिल्पा साहू यांच्या पतीचे नाव देवांश सिंह राठोड असे आहे. देवांश हे सुद्धा डीएसपी आहेत. एका मुलाखतीत देवांश यांनी सांगितले होते की, शिल्पा आणि माझी भेट एका ट्रेनिंग दरम्यान झाली होती. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि जवळीक वाढली. मग आम्ही दोघांनी लग्न केलं. जून 2019 मध्ये आम्ही विवाहबंधनात अडकलो. नक्षलविरोधी अभियानासाठी शिल्पा-देवांश एकत्र जात डीएसपी शिल्पा साहू आणि त्यांचे पती देवांश यांची सुरुवातीला पोस्टिंग नक्षलगर्स्त जिल्ह्यात झाली होती. अद्यापही शिल्पा दंतेवाडा येथे कार्यरत आहते. शिल्पा आणि देवांश हे दोघेही नक्षलविरोधी अभियानासाठी एकत्र जात असत. त्यांचे पती देवांश सिंह राठोड हे नक्षल विरोधी बटालियनचे नेत्रृत्व करत असत. तर शिल्पा दंतेश्वरी फायटरचे नेत्रृत्व करत असत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Chattisgarh, Coronavirus, Police

    पुढील बातम्या