नवी दिल्ली, 15 डिसेंबर: काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी मिस युनिव्हर्स हरनाझ कौर संधूसोबतचा (Harnaz Kaur Sandhu) फोटो सोशल मीडियावर शेअर (Social media) केला आहे. शशी थरूर हे ज्याप्रमाणे एक लेखक आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे एक हौशी व्यक्तीमत्त्व म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांच्या इंग्रजी भाषेचा वापर करण्याच्या स्टाईलवरूनही सोशल मीडियात अनेक मीम्स फिरत असतात. शशी थरूर जेव्हा जेव्हा सोशल मीडियात काही विशेष बाबी आणि फोटो शेअर करतात, तेव्हा त्यावर चित्रविचित्र प्रतिक्रिया आणि मीम्सचा पाऊस (Reactions and Mims) ठरलेला असतो. यावेळी मिस युनिव्हर्स हरनाझ कौरसोबत त्यांनी फोटो शेअर केल्यानंतर त्यावर नेटिझन्सनी प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
Delighted to congratulate Miss Universe @HarnaazKaur Sandhu in person on her triumphant return to India. She’s excited to be back in India for the New Year holidays & India, of course, is proud to welcome her. She’s just as poised & charming in person as on the stage. pic.twitter.com/OBj0KeTkoQ
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) December 15, 2021
हरनाझचं केलं अभिनंदन
आपल्या ट्विटमधून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्याबद्ल हरनाझचं अभिनंदन केलं. हरनाझनं मिळवलेला मिस युनिव्हर्सचा बहुमान आणि त्यानंतर तिचं भारतात झालेलं विजयी आगमन या गोष्टी पाहून आपण भारावलो आहोत, असं थरूर यांनी म्हटलं आहे. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि सुट्टीचा काळ एंजॉय करण्यासाठी हरनाझ भारतात आली असून तिचं स्वागत करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचं थरूर यांनी म्हटलं आहे. मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यापासून भारतात सध्या हरनाझचीच चर्चा सुरू आहे. ती सध्या तरुण आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत बनली असून तिच्या नावाचे ट्रेडदेखील व्हायरल होत आहेत. या परिस्थिती काँग्रेस नेते शशी थरूर यांनी तिची भेट घेत जोरदार आणि जाहीर स्वागत केलं आहे.
हे वाचा - सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत काय झालं? शिवसेना यूपीएत जाणार? संजय राऊतांनी म्हटल
स्टेजइतकीच प्रत्यक्षातही दिसते सुंदर
हरनाझ कौर ही मूर्तीमंत सौंदर्याचं उदाहरण असून ती स्टेजवर जितकी सुंदर दिसते, तितकीच प्रत्यक्षातही सुंदर असल्याचं थरूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. थरुर यांच्या या ट्विटला 12 हजारपेक्षाही अधिक जणांनी लाईक केलं असून त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
Jindagi ho to asi h https://t.co/CvZ3LABfrv
— Aditya Raghuwanshi (@AdityaR04001767) December 15, 2021
कमेट्सचा पाऊस
मचं तुमच्या कामाप्रति असलेलं समर्पण प्रशंनीय असल्याचा टोमणा एका युजरने लगावला आहे, तर तुम्हाला भेटून मनापासून आनंद झाल्याची प्रतिक्रिया स्वतः हरनाझ कौरनं या ट्विटला रिप्लाय करताना दिली आहे. या ट्विटरवर आलेल्या बहुतांश प्रतिक्रिया या थरूर यांची मस्करी करणाऱ्या आणि टर उडवणाऱ्या आहेत. थरूर यांचा या वयातील उत्साह वाखाणण्यासारखा आहे, असं एकानं म्हटलं आहे, तर आणखी एकाने 'जिंदगी हो तो ऐसी' असं म्हणत थरूर यांना चिमटा काढला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shashi tharoor, Twiter