मराठी बातम्या /बातम्या /देश /देशद्रोहाचा आरोप असलेला शरजील इमाम कोरोना पॉझिटिव्ह

देशद्रोहाचा आरोप असलेला शरजील इमाम कोरोना पॉझिटिव्ह

शरजील हा जेएनयूचा माजी विद्यार्थी असून भारतापासून आसाम स्वतंत्र करा अशी मागणी करीत त्याने देशविरोधी वक्तव्य केली आहेत.

नवी दिल्ली, 21 जुलै : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अगदी राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रेटींमध्येही अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अशातच देशविरोधी वक्तव्य करणारा शरजील इमाम हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.

एएनआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. खरंतर 25 जुलै रोजी त्याला दिल्ली येथील कोर्टात हजर करावयाचे होते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर त्याला 25 जुलै रोजी कोर्टात हजर करता येणार नाही.

हे वाचा-चीनविरोधात 'पुणेरी स्टाईल' बॅनर; ‘परदेशी जातीचे कुत्रे व चिनी माणसांना बंदी'

कोण आहे शरजील इमाम?

शरजील हा जेएनयूचा माजी विद्यार्थी असून भारतापासून आसाम स्वतंत्र करा अशी मागणी करीत त्याने देशविरोधी वक्तव्य केली आहेत. या प्रकरणात त्याला जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली आहे. चिथावणीखोर भाषण आणि देशद्रोहाचाही त्याच्यावर आरोप आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे अनेक मोठ्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

First published:

Tags: JNU, Sharjeel Imam