नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विशेष प्रतिक्रिया दिली नव्हती. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतरही पवारांनी मौन बाळगलं होतं. मात्र, या सर्वांचा हिशोब शरद पवार यांनी आज चुकता केलेला पाहायला मिळाला. दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यक विभागाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संस्थांचा गैरवापर भाजपकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप पवारांनी केला. काय म्हणाले पवार? देशातील वेगवगळ्या धर्मांच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी पक्षाची भूमिका महत्वाची असणार आहे. देशात सध्या विचित्र स्थिती आहे. लोकशाहीमध्ये जनतेनं निर्णय घेतला. पण यांच्यामुळे देशात समस्या निर्माण झालेल्या आहेत. भाजपचे नेते सांगतात वेगळे आणि करतात वेगळे अशी स्थिती आहे. पूर्ण देशात काय स्थिती आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नव्हती. पण, शिवसेनेतील एका गटाला सोबत घेवून सत्ता आणली. देशात 70 टक्के देशात भाजपची सत्ता नाही. 2024 मध्ये देशाचा नकाशा बदलू शकतो. फक्त मिळून लढण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले. दिल्लीच्या नेत्यांविरोधात कट : पवार यावेळी बोलताना पवार म्हणाले, की दिल्लीतील नेत्यांविरोधात कट रचला जात आहे. केंद्र सरकारची ताकद घेवून ईडी असो की सीबीआयचा वापर करीत आहे. भाजपला मदत होईल अशी कुठल्याही पक्षाने भूमिका घेवू नये. पंतप्रधान मोदी यांचे स्वतंत्र दिनाचे भाषण महिलांबाबत होते. मात्र, दोन दिवसात गुजरात सरकारने बिल्कीस बानो प्रकरणी काय भूमिका घेतली? हा महिलांचा सन्मान आहे का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला आहे.
वाचा - गद्दारी ते बंद खोलीतील बैठक.. राज ठाकरे यांच्या भाषणातील 5 मोठे ‘प्रहार’
मुस्लीमांना आरक्षण आवश्यक अशा घटना झाल्यानंतर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. अल्पसंख्यक समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सरकार बदललेले हा निर्णय देखील बदलला.दुबळा गट असतो त्यांना आरक्षण आवश्यक असते. मात्र, दलित आणि अल्पसंख्याक समाजाला आरक्षण आवश्यक आहे. मंडल आयोगाने नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठा बदल झाला आहे. मनीष सिसोदिया प्रकरणावरुन काँग्रेसला सुनावलं राजकीय पक्ष आपल्या विरोधी पक्षाच्या विरोधात ईडीचा वापर करीत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात पहिलं आरोपपत्र 100 कोटी, त्यानंतर 4 कोटी आणि आता 1 कोटीचे आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांचा काय गुन्हा होता ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते. नवाब मलिक यांच्या विरोधात जे आरोप आहे, असे कुठलेही आरोप नाही असे माहितीच्या अधिकारात सांगितले. संजय राऊत हे लिहत होते म्हणून त्यांच्याविरोधात ईडीचा वापर केला गेला. देशात सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा घणाघातही पवारांनी केला. हे देशाच्या विकासासाठी चांगले नाही. काँग्रेस नेता म्हणतो भाजपमध्ये गेल्याने मला चांगली झोप येते, असं म्हणत हर्शवर्धन पाटील यांना टोला लगावला. राजकीय नेत्यांपेक्षा सर्व सामान्य मतदारांना जास्त बुध्दी असते. मतदार या सर्वांना धडा शिकवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसला सुनावले. दिल्लीमध्ये आम आदी पक्षाला काँग्रेसने साथ द्यायला हवी होती. मनीष सिसोदियाच्या प्रकरणामध्ये काँग्रेसने पाठींबा देण्याची गरज होती, असं पवार म्हणाले.