शाहीन बागमध्ये केला मोदींना टोकाचा विरोध, आता नेत्याने थेट भाजपमध्येच केला प्रवेश

शाहीन बागमध्ये केला मोदींना टोकाचा विरोध, आता नेत्याने थेट भाजपमध्येच केला प्रवेश

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात 15 डिसेंबर 2019 रोजी राजधानी दिल्लीत शाहीन बाग परिसरात या आंदोलनाला सुरुवात झाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 16 ऑगस्ट: CAA विरोधात शाहीन बाग आंदोलनाने सरकारला घाम फोडला होता. अनेक दिवस चाललेलं हे आंदोलन जगभर चर्चेचा विषय बनलं होतं. या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले होते. या सगळ्या सरकार विरोधी आंदोलनात अग्रभागी असलेले कार्यकर्ते शहजाद अली यांनी आता थेट भाजपमध्येच प्रवेश केला आहे. शाहीन बागमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोकाचा विरोध केलेल्या अली यांनी आता पंतप्रधानांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

अली म्हणाले, भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष आहे अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. ती प्रतिमा चुकिची आहे हे मला सिद्ध करायचं आहे. भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष नाही. CAAच्या मुद्यावर सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अली यांच्या प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात 15 डिसेंबर 2019 रोजी राजधानी दिल्लीत शाहीन बाग परिसरात या आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्यानंतर या आंदोलनामध्ये विविध समाजातील लोक देखील सहभागी व्हायला सुरुवात झाली पण मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये मुस्लिम महिलांचा समावेश होता . शाहीन बाग आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीतील वाहतूक ठप्प झाली होती.

शाहीन बाग आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता देशभरातून लोक या परीसरात जमले होते.  महाराष्ट्रातून देखील नागपूर-मुंबई परिसरातून विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलना करिता शाहीन बाग येथे आले होते.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 16, 2020, 5:30 PM IST

ताज्या बातम्या