संभल, 22 जुलै : देशातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या 12 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आज एकाच दिवसात 38 हजारांच्या आसपास रुग्ण सापडले. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सध्या संपूर्ण देश एकत्र आहे. कोरोनाची लस लवकरात लवकर मिळावी यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. यातच समाजवादी पक्षाचे खासदार शफीकूर रहमान यांनी कोरोना हा आजार नसून आपल्या क्रुरकर्माची अल्लाहनं दिलेली शिक्षा आहे, असे अजब व्यक्तव्य केले आहे. एवढेच नाही तर नमाज पठण करून कोरोनापासून वाचू शकतात, असेही शफीकूर रहमान म्हणाले.
बकरी ईदच्या निमित्ताने मश्जीद खुले करण्याबाबत शफीकूर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे धक्कादायक विदान केले. यावेळी शफीकूर यांनी, बकरी ईदच्या निमित्ताने जनावरांची बाजारपेठ उघडण्याची मागणी केली आहे, जेणेकरून मुस्लिम समाजातील लोक बलिदानासाठी जनावरे खरेदी करु शकतील. एवढेच नाही तर मश्जीद उघडून तेथे लोकं कोरोनाचा नाश करण्यासाठी प्रार्थना करतील असेही ते त्यावेळी म्हणाले.
वाचा-आता घरीही तुम्ही कोरोना संसर्गापासून सुरक्षित नाही, तज्ज्ञांचा नवा दावा
No cure of Coronavirus has been found so far, which means Coronavirus is not a disease but punishment by God for our sins. The best cure of Corona is that we all pray to God: Shafiqur Rahman Barq, Samajwadi Party MP from Sambhal https://t.co/5lq2gZZhYe
— ANI UP (@ANINewsUP) July 21, 2020
वाचा-24 तासांत सर्वाधिक रुग्ण झाले निरोगी, तर रुग्णांची संख्या 12 लाखांच्या जवळ
यावेळी खासदारांनी, "मश्जीदीमध्ये केवळ 5 लोकांनी नमाज पठण करून काही होणार नाही. सर्व मुसलमानांनी नमाज पठण केले तरच हा देश वाचू शकतो. ईदच्या दिवशी आम्ही अल्लाहची माफी मागू, तो आपले सर्व गुन्हे माफ करेल आणि मला आशा आहे की आपण लवकरच या सगळ्यातून बाहेर पडू". दुसरीकडे सरकारच्या वतीने बकरी ईदसाठी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र केवळ 5 लोकांना मशीदीत जाण्याची मुभा असणार आहे. इतरांना घरून नमाज पठण करण्यास सांगण्यात येणार आहे.