मराठी बातम्या /बातम्या /देश /

Hats off! पेन्शनच्या पैशांतून रस्त्यातील खड्डे बुजवतं हे ज्येष्ठ दाम्पत्य; 11 वर्षांत भरले 2 हजारांपेक्षा जास्त खड्डे

Hats off! पेन्शनच्या पैशांतून रस्त्यातील खड्डे बुजवतं हे ज्येष्ठ दाम्पत्य; 11 वर्षांत भरले 2 हजारांपेक्षा जास्त खड्डे

कमाल! हे ज्येष्ठ दांपत्य स्वतः रस्त्यावरचे खड्डे बुजवायचं काम करतात. त्यांनी आतापर्यंत यासाठी 40 लाख रुपये खर्चही केला आहे. गेली 11 वर्षं ते हे काम करत आहेत.

कमाल! हे ज्येष्ठ दांपत्य स्वतः रस्त्यावरचे खड्डे बुजवायचं काम करतात. त्यांनी आतापर्यंत यासाठी 40 लाख रुपये खर्चही केला आहे. गेली 11 वर्षं ते हे काम करत आहेत.

कमाल! हे ज्येष्ठ दांपत्य स्वतः रस्त्यावरचे खड्डे बुजवायचं काम करतात. त्यांनी आतापर्यंत यासाठी 40 लाख रुपये खर्चही केला आहे. गेली 11 वर्षं ते हे काम करत आहेत.

हैदराबाद, 20 जुलै: आपल्या देशात दरवर्षी रस्ते अपघातात (Road Accidents) हजारो जणांचा जीव (Deaths) जातो, अनेक लोक अपंग होतात. यासाठी जुने नियम, दर्जाहीन रस्ते, नियमांचे उल्लंघन, अती वेगानं वाहन चालवण्याबरोबरच मोठं कारण आहे ते म्हणजे रस्त्यातील खड्डे. देशात रस्ते अपघातात दररोज 415 लोकांचा मृत्यू होतो. त्यातही तरुण पिढीतील व्यक्तींच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. रस्त्यातील खड्डयामुळे अपघात झाल्यानंतर लोक सरकार, प्रशासन यांच्यावर त्याचं खापर फोडतात; अशा प्रसंगी स्थानिक प्रशासन कधी तातडीनं कारवाई करतं तर काही वेळा दुर्लक्ष केलं जातं. अनेकदा रस्त्यातील खड्डे तसेच राहतात.

अशी परिस्थती अनुभवणाऱ्या एका ज्येष्ठ दाम्पत्यानं(Senior Citizen Couple) मात्र बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर भर देत अनेकांचे जीव वाचवले आहेत. आपल्या कार्यानं त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवलं आहे. प्रशासन आणि सरकारी यंत्रणेलाही न बोलता चांगलीच चपराक मारली आहे.

गंगाधर तिलक कटनम (Gangadhar Tilak Katnam) आणि व्यंकटेश्वरी कटनम असं या दाम्पत्याचं नाव असून, ते तेलंगणची (Telangana) राजधानी हैद्राबादमधील (Hyderabad) रहिवासी आहेत. अकरा वर्षांपासून त्यांनी रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे व्रत स्वीकारलं असून, त्यासाठीचा सर्व खर्च ते स्वतःच्या पेन्शनमधून (pension) करत आहेत. आतापर्यंत शहरातील 2000 पेक्षा जास्त खड्डे (Potholes) त्यांनी बुजवले असून, त्याकरता तब्बल 40 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यांच्या या कामामुळे ते ‘रोड डॉक्टर’ (Road Doctor)म्हणून प्रसिद्ध आहेत.

100 रुपये द्या आणि माझ्यासोबत सेल्फी घ्या, ‘या’ मंत्र्यांनी लढवली आयडियाची कल्पन

73 वर्षांचे गंगाधर कटनम यांनी 35 वर्षे भारतीय रेल्वेत (Indian Railway) काम केलं. निवृत्त झाल्यावर ते एका सॉफ़्टवेअर कंपनीत काम करण्यासाठी हैद्राबादला आले. ही नोकरी करत असताना त्यांनी पाहिलं की शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून, अनेक तरुण मुलांचा त्यात बळी जात आहे. याबाबत प्रशासनाकडे त्यांनी दाद मागितली; पण त्यांना अगदी थंड प्रतिसाद मिळाला.

अनेक प्रयत्न केल्यानंतरही प्रशासकीय यंत्रणा ढिम्मच राहिल्यानं अखेर त्यांनी स्वतःच कंबर कसली आणि आपल्या पत्नीच्या सहकार्यानं रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरुवात केली. खड्डा दिसेल तिथं हे दाम्पत्य आपली कार आणि आवश्यक साहित्य घेऊन जाऊ लागलं आणि खड्डे बुजवू लागलं. या कामासाठी त्यांनी आपली नोकरीही सोडली. त्यांच्या या कामामुळे ते रोड डॉक्टर म्हणून तर त्यांची कार पॉटहोल अॅम्ब्युलन्स(Potholes Ambulance) म्हणून ओळखली जाऊ लागली.

नंतर या कामासाठी कटनम यांनी श्रमधन (Shramdan) नावाची संस्था स्थापन केली. लोक स्वेच्छेनं या संस्थेला देणगी देतात, त्या मदतीतून खड्डे बुजवण्याचे काम केलं जातं. गंगाधर कटनम आणि त्यांच्या पत्नीच्या कार्याची दखल आता प्रशासनानंदेखील घेतली असून, सरकारी अधिकारी त्यांना आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळं कटनम यांच्या कार्याची व्याप्ती वाढली असून लोकांचा सहभागही वाढत आहे.

50 टक्के लहान मुलांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडिज, तर अजूनही 40 कोटी नागरिकांना धोका

कटनम यांनी बुजवलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होण्याचे टळलं आहे. अनेक जीवच नव्हे तर अनेक कुटुंब वाचली. अनेकांच्या भविष्यात अंधकार निर्माण होण्याचं टळलं आहे. कोणत्याही बाबीसाठी सरकारला धारेवर धरण्यापेक्षा स्वतःच्या कामानं कटनम दाम्पत्यानं एक वेगळा धडा समाजासमोर ठेवला आहे. वृद्धापकाळातही त्यांची चाललेली ही धडपड कौतुकास्पद आणि अभिमानस्पद आहे.

First published:

Tags: Senior citizen, Telangana