• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 50 टक्के लहान मुलांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडिज, तर अजूनही 40 कोटी नागरिकांना धोका, ICMR च्या ‘सिरो सर्व्हे’तील निष्कर्ष

50 टक्के लहान मुलांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडिज, तर अजूनही 40 कोटी नागरिकांना धोका, ICMR च्या ‘सिरो सर्व्हे’तील निष्कर्ष

देशातील 6 ते 17 या वयोगटातील 50 टक्क्याहून अधिक (More than 50 percent) मुलांच्या शरीरात कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज(antibodies) आढळून आल्या आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 जुलै : देशातील कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona virus) ओसरत असून तिसऱ्या लाटेची (Third wave) शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या चौथ्या 'सिरो सर्व्हे'त (Fourth Sero Survey) काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवले गेले आहेत. देशातील 6 ते 17 या वयोगटातील 50 टक्क्याहून अधिक (More than 50 percent) मुलांच्या शरीरात कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज(antibodies)  आढळून आल्या आहेत. ICMRनं देशातील 6 ते 17 वर्षांदरम्यानच्या व्यक्ती आणि काही आरोग्य कर्मचारी यांना घेऊन केलेल्या ‘सिरो  सर्व्हे’मध्ये 67.6 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरून देशातील 40 कोटी नागरिकांमध्ये अँटिबॉडिज नसल्यामुळे त्यांना कोरोनापासून असणारा धोका कायम असल्याचं सिद्ध झालं आहे. लहान मुलांमध्ये अँटिबॉडिज देशातील जवळपास 50 टक्क्यांहून अधिक लहान मुलांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज आढळल्याची माहिती ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे. लहान मुलांना कोरोनाची न देताही निम्म्याहून अधिक मुलांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडिज असणं, हे मुलांना कोरोना होऊन गेल्याचं लक्षण आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. सर्व्हेतील महत्त्वाची निरीक्षणं हा सर्व्हे जून आणि जुलै महिन्यात करण्यात आला असून त्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांच्या अँटिबॉडिजचं प्रमाण तपासण्यात आलं. यामध्ये देशातील दोन तृतीयांश नागरिकांमध्ये अँटिबॉडिज तयार झाल्या असून एक तृतीयांश नागरिकांमध्ये त्या नसल्याचं आढळून आलं. देशासाठी ही एक प्रकारे दिलासादायक बाब असून हर्ड इम्युनिटीच्या दिशेने आपण प्रवास करत असल्याचं निदर्शक आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. सर्व्हेतील काहीजणांमध्ये कोरोना होऊन गेल्यानंतर अँटिबॉडिज तयार झाल्या आहेत, तर काहींच्या शरीरात लसीकरणामुळे अँटिबॉडिज तयार झाल्या आहेत. हे वाचा -चिंताजनक! लसीकरण झालेल्या महिला डॉक्टरला Coronaच्या दोन व्हेरिएंटची लागण असा केला ‘सिरो  सर्व्हे’ ICMR च्या वतीनं करण्यात आलेला हा चौथा ‘सिरो  सर्व्हे’ होता. यामध्ये 6 ते 17 वयोगटातील 28975 मुलं आणि 7252 आरोग्य कर्मचारी यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. देशातल्या वेगवेगळ्या 21 राज्यांतील 70 जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.
  Published by:desk news
  First published: