Home /News /national /

भाजपमध्ये मोठं खिंडार, एकाचवेळी 15 भाजप नेत्यांचा पक्षाला रामराम

भाजपमध्ये मोठं खिंडार, एकाचवेळी 15 भाजप नेत्यांचा पक्षाला रामराम

भाजप (BJP)च्या 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण.

    लक्षद्वीप, 13 जून: लक्षद्वीपमध्ये भाजप (Lakshadweep BJP) च्या 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. आयशा सुल्ताना विरोधात राजद्रोहाचा (Sedition Case Filed) गुन्हा दाखल झाल्यानं नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचं पाऊल उचललं आहे. फिल्ममेकर आयशा सुल्तानाविरोधात (filmmaker Aisha Sultana) राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर भाजप नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे. लक्षद्वीप भाजप अध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांनी आयशा सुल्तानाविरोधात राजद्रोहाची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनंतर तिच्यावर गुन्हा दाखल झाला. एएएनआय या वृत्तसंस्थेनं या संदर्भातलं वृत्तं दिलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे? शुक्रवारी लक्षद्वीपची पहिली महिला फिल्ममेकर आयशा सुल्तानावर कावारत्ती पोलीस स्टेशनमध्ये राजद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका टीव्ही शोमधील चर्चेदरम्यान आयशा सुल्ताना यांनी लक्षद्पीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या यावरुन टीका केली होती. सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, भाजपचे राज्य सचिव अब्दुल हामिद यांनी सांगितलं की, आपल्या चेतलाथच्या बहिणीविरोधात खोटी आणि अयोग्य तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्हाला यावर आक्षेप आहे आणि आम्ही आमचा राजीनामा देत आहोत. हेही वाचा- लसीकरणात देशभरातल्या खासगी रुग्णालयांचा निष्काळजीपणा, वाचून बसेल धक्का भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप राज्य सचिव अब्दुल हामिद मुल्लीपुरा, वक्फ बोर्डाचे सदस्य उम्मुल कुलूस पुथियापुरा, खादी बोर्डाचे सदस्य सैफुल्ला पक्कियोडा, जाबिर सलीहथ मंजिल आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान भाजप पक्षाच्या 12 नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वाक्षरीचं एक पत्र अब्दुल खादर हाजी यांनी पाठवण्यात आलं आहे. या पत्रात लिहिलं आहे की, भाजपला हे माहित आहे की प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे निर्णय जनविरोधी, लोकशाही विरोधी असून लोक या सगळ्याला त्रासलेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Narendra modi

    पुढील बातम्या