Home /News /national /

देशभरातल्या खासगी रुग्णालयाचा निष्काळजीपणा, लसींच्या वापरासंदर्भातली मोठी माहिती उघड

देशभरातल्या खासगी रुग्णालयाचा निष्काळजीपणा, लसींच्या वापरासंदर्भातली मोठी माहिती उघड

Corona Vaccination: देशातल्या लसीकरणा संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. एकीकडे देशभरात लसीची (Coronavirus Vaccine) तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे खासगी रुग्णालयांमधील लशींच्या साठ्याविषयी मोठी माहिती उघड झाली आहे.

    नवी दिल्ली, 13 जून: देशातल्या लसीकरणा (Corona Vaccination) संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. एकीकडे देशभरात लसीची (Coronavirus Vaccine) तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे खासगी रुग्णालयांमधील लशींच्या साठ्याविषयी मोठी माहिती उघड झाली आहे. खासगी रुग्णालयांनी (Private Hospital) गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात केवळ 17 टक्के लसींचा साठा वापरला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 4 जूनला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक अहवाल जारी केला. या अहवालात नमूद करण्यात आलं आहे की, मे महिन्यात देशात एकूण 7.4 कोटी लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले होते. यापैकी 1.85 कोटी लसीचे डोस खासगी रुग्णालयांसाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर खासगी रुग्णालयांनी यातून 1.29 कोटींचे डोस खरेदी केला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयांनी केवळ 22 लाख डोसचा वापर केला आहे. म्हणजेच मे महिन्यात खासगी रुग्णालयांकडे 1.07 कोटी लसीचे डोस उपलब्ध होते. हेही वाचा- VIEDO: रत्नागिरी जिल्ह्याला दोन दिवस रेड अलर्ट, सर्व यंत्रणा सतर्क आतापर्यंत 25.87 कोटींहून अधिक लसींचे डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात आले असल्याची माहिती केंद्र सरकारनं शनिवारी दिली. तसंच पुरवठा करण्यात आलेल्यांपैकी 24.76 कोटी लस वापरल्या गेल्या आहेत. मात्र काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अजूनही 1.12 कोटींहून अधिक लसींचे डोस उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं. दरम्यान लसीकरणाचे 10.81 लाखांहून अधिक डोस प्रक्रियेत असून येत्या तीन दिवसात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ते पुरवण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine cost, Coronavirus

    पुढील बातम्या