मुंबई, 28 ऑक्टोबर : कोणत्याही लहान मुलांना फुलाचं चित्र काढायला सांगितलं, तर हमखास सूर्यफूल चितारणाऱ्यांची संख्या मोठी असते. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सूर्यफुलाचं चित्र काढणं सोपं आहे. तसंच याचा आकर्षक पिवळा रंग मन प्रफुल्लित करतो. सूर्यफुलाबद्दल अनेक अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत; पण अनेकांना या फुलाबद्दल पुरेशी माहिती नसते. महत्त्वाची गोष्ट अशी, की सूर्यफूल हे एक स्वतंत्र फूल नाही. यासाठीच शास्त्रज्ञांनी या फुलाला आजपर्यंत फुलाचा दर्जा दिलेला नाही. सूर्यफूल दिसायला आकर्षक आहे. अगदी लहान-थोर सगळ्यांना सूर्यफूल, त्याचा पिवळा रंग आवडतोच; पण शास्त्रज्ञांनी या फुलाला फुलाचा दर्जा का नाकारलाय, याबद्दल आपण जाणून घेऊ या. कदाचित, आपल्यातल्या काही जणांना याबद्दलचा खुलासा ज्ञानात भर घालणारा ठरू शकतो.
शास्त्रज्ञांच्या मते...
विज्ञानाच्या अनुषंगाने फुलाची एक व्याख्या केली गेलीय. त्याचे काही निकष ठरलेले आहेत; पण सूर्यफूल या कुठल्याच निकषात बसत नाही. यासाठी शास्त्रज्ञ सूर्यफुलाला फूल मानत नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते, सूर्यफूल हे एकच फूल नसून अनेक फुलांचा गुच्छ आहे. याची एक-एक पाकळी जी फुलाच्या मध्यभागाशी जोडली गेलीय, ती प्रत्येक पाकळी म्हणजे एक फूल आहे.
हेही वाचा - काय सांगता! जिवंत व्यक्तीला जमिनीत गाडून करणार मानसिक आजारांवर उपचार; काय आहे प्रकरण?
सूर्यफुलाच्या पाकळ्यांची संख्या खूप असते. तसंच याच्या मध्यभागात एक डिस्क असते. त्यात शेकडो बिया असतात. म्हणूनच सूर्यफूल हे एक फूल नसून अनेक फुलांचा गुच्छ असल्याचं मानलं गेलंय. एका फुलापासून एका बीजाची किंवा एका फळाची निर्मिती होते. सूर्यफुलाच्या मध्यभागी असलेल्या गोल भागात काही शेकड्यात बिया तयार होतात. त्यालाच सूर्यफुलाचं बीज म्हटलं जातं. या बियांपासून तेल काढलं जातं आणि ते आरोग्यासाठी हितावह असते.
सूर्याच्या दिशेनुसार फिरतं सूर्यफूल
सूर्यफूलाबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्याच्या दिशेनुसार हे फूलही दिवसभर फिरते. या कारणास्तव या फुलाला सूर्यफूल म्हटलं जातं. साधारणपणे असा समज आहे, की सूर्यफूल हे फक्त पिवळ्या रंगाचंच असते; पण सूर्यफुलाच्या एकंदर ७० विविध जाती आहेत. या प्रत्येकाचा आकार, रंगरूप, लांबी यात विविधता आहे. काही जातींच्या सूर्यफुलांचा रंग नारिंगी आणि जांभळाही असतो.
जगात अनेक अशा गोष्टी आहेत, ज्याबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. सूर्यफुलाबद्दलची ही माहिती नक्कीच ज्ञानात भर घालणारी ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sunflower