जाहिरात
मराठी बातम्या / देश / काय सांगता! जिवंत व्यक्तीला जमिनीत गाडून करणार मानसिक आजारांवर उपचार; काय आहे प्रकरण?

काय सांगता! जिवंत व्यक्तीला जमिनीत गाडून करणार मानसिक आजारांवर उपचार; काय आहे प्रकरण?

थेरपी

थेरपी

जिवंत व्यक्तीला जमिनीत गाडल्याचं तुम्ही ऐकलं नसेल. ही अंधश्रद्धा नसून व्यक्तीला चिंतामुक्त करण्यासाठी केलेला उपाय आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 28 ऑक्टोबर :  बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण वाढलंय. स्पर्धा आणि सामाजिक प्रतिष्ठा यामुळे सतत दडपण, भीती मनात राहते. त्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होतो. मानसिक आजारांवर अनेक उपचारपद्धतींद्वारे उपचार केले जातात. त्यात नवनवीन संशोधनही होत आहे. मात्र रशियातील एका कंपनीने विचित्र प्रकारची उपचार पद्धती विकसित केली आहे. यात चक्क जिवंत व्यक्तीला जमिनीत गाडलं जातं. यामुळे रुग्णाच्या मनातील भीती किंवा काळजी कमी होण्यास मदत होते. मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना तो दफन करण्याची पद्धत काही धर्म-संप्रदायांमध्ये असते. मात्र आजवर कधी जिवंत व्यक्तीला जमिनीत गाडल्याचं तुम्ही ऐकलं नसेल. रशियामधील एका कंपनीनं मात्र मानसिक आजारांवरील उपचार पद्धतीचा भाग म्हणून रुग्णाला जमिनीत गाडण्याची पद्धत विकसित केली आहे. ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. Prekated Academy या कंपनीनं ही उपचार पद्धती सुरू केली आहे. Yakaterina Preobrazhenskaya यांनी याची सुरुवात केली. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी या थेरेपीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. हेही वाचा - नियतीचा अजब खेळ! बळीचा कोंबडा वाचला पण बळी द्यायला गेला त्याचाच जीव गेला या उपचार पद्धतीमध्ये ग्राहकांना फ्युनरल पॅकेज दिलं जातं. त्याद्वारे त्यांना स्वतःमधील भीती आणि काळजी दूर करण्यासाठी मदत केली जाते. या थेरेपीमध्ये व्यक्तीला जमिनीच्या आत गाडून घ्यावं लागतं. हा कालावधी 20 मिनिटांपासून ते 60 मिनिटांपर्यंत असू शकतो. या थेरेपीसाठी 47 लाख रुपये ग्राहकांना मोजावे लागतात. ही उपचार पद्धती पूर्णपणे सुरक्षित असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वापर करण्यात आलेली शवपेटी ग्राहकांना परत दिली जाते. डेलिस्टारच्या वृत्तानुसार, या उपचार पद्धतीचं ऑनलाईन व्हर्जनही उपलब्ध आहे. त्यात थेरेपी घेणाऱ्या व्यक्तीला सुंदर संगीत ऐकायला मिळतं. मेणबत्त्या लावल्या जातात आणि मृत्यूपत्र लिहिण्याची संधी मिळते. या ऑनलाईन पॅकेजच्या माध्यमातून लोकांना भीती आणि काळजी दूर करण्यासाठी ‘स्ट्रेस थेरेपी’ दिली जाते. त्यासाठी 12 लाख रुपये ग्राहकांना भरावे लागतील, मात्र पैशाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी ग्राहकांनी ‘फुल इमर्शन पॅकेज’ म्हणजे जमिनीत पूर्ण गाडून घेण्याचं पॅकेज घ्यावं, असं कंपनीचं म्हणणं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    गाडून घेण्याच्या थेरेपीसाठी अनेक ग्राहक कंपनीला संपर्क करतात. मात्र प्रत्येक ग्राहकाला ही थेरेपी दिली जात नाही. भीती आणि काळजी घालवण्यासाठी इतरही अनेक पर्याय असतात. त्यांची माहिती कंपनी ग्राहकांना देते. त्यानुसार हवा तो पर्याय निवडण्याची ग्राहकांना मुभा असते. स्वतःमधील भीती दूर करून आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी या थेरेपीचा उपयोग होऊ शकतो, असं कंपनीनं म्हटलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात