Covid-19 भयंकर परिस्थितीची अखेर सुप्रीम कोर्टानेच घेतली दखल; मोदी सरकारकडे मागितला प्लॅन

Covid-19 भयंकर परिस्थितीची अखेर सुप्रीम कोर्टानेच घेतली दखल; मोदी सरकारकडे मागितला प्लॅन

देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा कमी पडण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन सर्वोच्च न्यायालयाने आता केंद्राला नोटीस बजावली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल: भारतात कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुप्रीम कोर्टा (Supreme Court)ने याची दखल घेत केंद्र सरकारला (Central Government) नोटीस बजावली आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने चार मुद्द्यांवरुन प्लॅनची माहिती मागवली आहे. कोरोना संसर्गाच्या संबंधित स्थितीवरुन देशातील विविध हायकोर्टांमध्ये दाखल याचिकां सुप्रीम कोर्टाने आपल्याकडे ट्रान्सफर केल्या आहेत. या प्रकरणी आता शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे.

या 4 मुद्द्यांवर मागितला प्लॅन

सर्वोच्च न्यायालयाने ज्या चार मुद्यांवर केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे त्यामध्ये देशभरात ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती, आवश्यक औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत आणि लॉकडाऊन जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारांना असावा या मुद्द्यांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं, कोविड 19 सारख्या परिस्थितीवरुन देशभरातील सहा वेगवेगळ्या हायकोर्टात सुनावणी होणं हे संभ्रम निर्माण करणारं आहे.

वाचा: 1 मेपासून 18 सर्वांना मिळणार कोरोना लस, शनिवारपासून CoWin वर रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात कोविड-19 ची सध्या असलेल्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं, कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा करण्याच्या मुद्द्यांवर एक राष्ट्रीय योजना असायला हवी. सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटलं की, देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याच्या पद्धतीशी संबंधीत मुद्द्यांवर विचार केला जाईल.

खंडपीठाने म्हटले की, जागतिक महामारी दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्याच्या उच्च न्यायालयांच्या अधिकाराच्या संबंधीत बाबींचेही मूल्यमापन केले जाईल.

त्याच दरम्यान बुधवारी रात्री उशिरापर्यंत दिल्ली हायकोर्टात एक सुनावणी झाली. आज दुपारी 3 वाजता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोविड 19 च्या गंभीर रुग्णांवर उपचार करणाऱ्या दिल्लीतील रुग्णालयांना कुठल्याही प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले.

Published by: Sunil Desale
First published: April 22, 2021, 2:59 PM IST

ताज्या बातम्या