जाहिरात
मराठी बातम्या / देश / "आजचं पत्र हे केवळ माहितीसाठी; ट्रेलर अजून बाकी आहे, लवकरच सर्वांना बेनकाब करणार" : संजय राऊत

"आजचं पत्र हे केवळ माहितीसाठी; ट्रेलर अजून बाकी आहे, लवकरच सर्वांना बेनकाब करणार" : संजय राऊत

  'ज्या पद्धतीने भाजपने शिवसेनेच्या बाबतीत वातावरण पसरवलं गेलं त्याची गरज नव्हती.

'ज्या पद्धतीने भाजपने शिवसेनेच्या बाबतीत वातावरण पसरवलं गेलं त्याची गरज नव्हती.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा ईडी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. आपण पाठवलेलं पत्र केवळ माहितीसाठी असून ट्रेलर अजून बाकी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहून तपास यंत्रणांवर अनेक आरोप केले. संजय राऊत यांच्या या लेटरबॉम्ब नंतर एकच खळबळ उडाली. महाराष्ट्रात मध्यावती निवडणूक करण्यास नाकारले तर जेलमध्ये टाकण्याची धमकी मला देण्यात आली. महाविकास आघाडी सरकार पाडण्यास भूमिका बजावण्यास मला सांगण्यात आल्याचं राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आता नवा गौप्यस्फोट केला आहे. (Sanjay Raut said letter is just for information trailer yet to be release) या दडपशाहीला जुमानणार नाही संजय राऊत म्हणाले, कशाप्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं कर्तव्य म्हणून मी पत्र लिहिलं आहे. देशभरातून मला जवळपास सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांचे आता फोन आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचं खासकरुन महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि झारखंडच्या बाबतीत जे काही सुरू आहे, की या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं. जे प्रमुख लोक आहेत त्यांचा गळा दाबायचा, त्यांना अडकवायचं, त्यांच्या विरोधात खोटे पुरावे निर्माण करायचे, त्यांना बदनाम करायचं. पण ते भ्रमात आहेत. आमच्या सारखे लोक या दडपशाहीला जुमानणार नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणा क्रिमिनल सिंडिकेटचा भाग बनल्या सध्या ईडी आणि इतर यंत्रणा या भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटच्या एक भाग बनल्या आहेत. आजचं हे लेटर आहे ना तो ट्रेलर सुद्धा नाहीये. आजचं पत्र हे मी केवळ माहितीसाठी लिहिलं आहे. हा ट्रेलर सुद्धा नाहीये, ट्रेलर यायचा आहे. हे कशाप्रकारे ईडीचे लोकांचं काम सुरू आहे, यांचेच कशाप्रकारे आर्थिक घोटाळे आहेत, यांच्याकडून मनी लॉन्ड्रिंग सुरू आहे, हे ब्लॅकमेलिंग करतात, पैसे गोळा करतात, यांचे वसूली एजंट आहेत. लवकरच ईडीला बेनकाब करणार. हे ठाकरे सरकारला, शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करत आहेत असंही संजय राऊत म्हणाले. आतापर्यंत राष्ट्रीय एकात्मता आणि देश म्हणून गप्प बसलो आहोत. मी इतकंच सांगतो की, ही सुरुवात आहे. पवार कुटुंबाकडे पाच दिवस जाऊन ईडीचे लोक बसले. त्यांचं म्हणणं होतं की, या नेत्याचं नाव घ्या आणि त्या नेत्याचं नाव घ्या तर आम्ही येथून जातो. हे पवारांच्या बाबतीत घडलं आहे असंही संजय राऊत म्हणाले. वाचा :  ‘सत्यमेव जयते’ म्हणत संजय राऊत यांनी दिले मोदी सरकारविरोधात नव्या संघर्षाचे संकेत आमच्या पाठोपाठ तुम्हालाही कोठडीत यावं लागेल हे भाजपचे नेते वारंवार सांगत आहेत ना, की अनिल देशमुख यांच्या बाजुच्या कोठडीत तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे तुमची इच्छा असेल तर आम्ही जाऊ पण लक्षात घ्या आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालाही यावं लागेल कारण तुमची पाप जास्त आहेत, आम्ही शुद्ध आहोत. आम्ही घाबरत नाहीत तुम्हाला असंही राऊत म्हणाले. लवकरच ईडीला बेनकाब करणार राऊत पुढे म्हणाले, सरकार पाडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अनेक नेते जाहीरपणे धमक्या देत आहेत की सरकार आता पाडू. मी आता जास्त बोलत नाही. ईडीला ज्या कारवाया करायच्या आहेत त्या कायदेशीरपणे करत रहावं. पण एक गोष्ट सांगतो तुमचा नकाब उतरवल्याशिवाय राहणार नाही. ईडीच्या कारवाया काय चालल्या आहेत, याचा सूत्रधार कोण आहे हे मी आता लवकरच तुम्हाला सांगेल. वाचा :  मोदींच्या भाषणानंतर काँग्रेस आक्रमक, भाजप कार्यालयासमोर ‘माफी मागा’ आंदोलन मुलीच्या लग्नातील डेकोरेडर्सची चौकशी झाली महाराष्ट्राच्या नागरिकांना बाहेरील लोक सुपारी घेऊन येथे येतात आणि बेकायदेशीरपणे डांबून ठेवतात. माझ्या मुलीच्या लग्नातील डेकोरेटरला उचलून आणलं, त्याला विचारलं किती पैसे मिळाले? हे ईडीचं काम आहे? ईडी कार्यालयात जाऊन बेकायदेशीरपणे जाऊन कोण बसतं आणि ऑपरेट करतं? ईडीच्या कार्यालयात इतरांना प्रवेश नाहीये मग हे दोन-तीन लोक ईडी कार्यालयात जाऊन बसतात आणि त्यांना ऑर्डर देतात. मी देवेंद्र फडणवीसांना आवाहन करतोय… आणि त्यांना माहिती आहे मला काय बोलायचं आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत. …तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रचंड त्रास दिला जात आहे. रोज सकाळी एखादा माणूस उठतो आणि त्याच्यावर ईडी कारवाई करते. मी मागे सुद्धा बोललो की, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही असंही संजय राऊत म्हणाले. ईडी कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार मी पुढील पत्रकार परिषद शिवसेना भवनात घेणार आहे आणि त्यानंतरची पत्रकार परिषद ही ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर घेणार आहे. हजारो लोकांच्या साक्षीने पत्रकार परिषद घेणार, तुम्ही पाहा मी काय करतो, त्या दिवशी काय होतं हे पाहा असंही संजय राऊत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ED , sanjay raut
  • First Published :
जाहिरात
जाहिरात