जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! फक्त माणसांमध्येच नाही तर भारतात या ठिकाणीही सापडला कोरोना व्हायरस

धक्कादायक! फक्त माणसांमध्येच नाही तर भारतात या ठिकाणीही सापडला कोरोना व्हायरस

धक्कादायक! फक्त माणसांमध्येच नाही तर भारतात या ठिकाणीही सापडला कोरोना व्हायरस

एखाद्या भागात कोरोनाचा किती संसर्ग झाला हे या अभ्यासातून कळायला मदत होईल असा अंदाज CCMBच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद 22 ऑगस्ट: देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेले काही दिवस तर 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण एकाच दिवशी सापडत आहेत. रुग्ण संख्या वाढत असतांनाच काही नवीन गोष्टीही समोर येत आहेत. हैदराबादमध्ये केलेल्या एका अभ्यासात कोरोना व्हायरसचे नमुने हे सांडपाण्यातही आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सेंटर फॉर मॉलिक्युलर बॉयलॉजी (CCMB)ने याबाबतचा अभ्यास केला आहे. हा व्हायरस संसर्गजन्य असल्याचं अद्याप आढळून आलेलं नाही. मात्र एखाद्या भागात कोरोनाचा किती संसर्ग झाला हे यातून कळायला मदत होईल असा अंदाज CCMBच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोना विरुद्धच्या उपाय योजना करतांना या निष्कर्षांची मोठी मदत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एएफपीच्या आकड्यांनुसार जगभरात कोविड-19 (Covid-19) च्या रुग्णांचा आतापर्यंत 8 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे संसर्ग झालेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार गेली आहे. वर्ल्ड ओ मीटरच्या आकड्यांनुसार संपूर्ण जगभरात 23,149,731 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामुळे 8 लाख 03 हजार 807 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 57 लाख, 32 हजार 515 रुग्ण कोरोनापासून ठीक झाले आहेत. अखेर पाकिस्तानने मान्य केलं, भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद राहतो कराचीत कोरोना संसर्गाच्या प्रकरणात अमेरिका जगभरात पहिल्या, ब्राजील दुसरा आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मृत्यूची सर्वाधिक संख्या अनुक्रमे अमेरिका, ब्राजील, मेक्सिको या देशात आहे. भारतात या यादीच चौथा क्रमांक आहे. जगभर सध्या एकच प्रश्न विचारला जातोय. तो प्रश्न आहे कोरोनावर लस केव्हा मिळणार?  यावर जगभर संशोधन सुरु असून काही महिन्यांमध्ये ही लस तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही लस तयार झाली तर ती जगभर पोहोचवायची कशी ही सर्वात मोठी समस्या सध्या जगासमोर आहे. Unlock 3:  प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध उठवा, केंद्राने राज्यांना फटकारलं यावर जागतिक आरोग्य संघटनेने WHO एक मेगा प्लान तयार केला आहे. तो सर्व देशांना दिला जाणार आहे. याची अंमलबजावणी सक्तीची नसली तरी तो मार्गदर्शक तत्व म्हणून उपयोगी होणार आहे. कोरोनावर लस आली आणि ती फक्त प्रगत देशांमधल्याच लोकांना मिळाली तर ते जगावरचं आणखी एक मोठं संकट असेल असं WHO म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात