लखनऊ, 9 जुलै : देशातील बड्या नेत्याच्या पत्नीचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचं शनिवारी निधन (Sadhna Gupta Death) झालं. गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. यांच्या मुलाचं नाव प्रतिक यादव असून ते राजकारणात सक्रिय नाहीत. साधना गुप्ता बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना फुप्फुसात संसर्ग झाल्यानंतर मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुलायम सिंह यादव यांनाही काही दिवसांपूर्वी आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. साधना गुप्ता यांना काही दिवसांपूर्वी ताप आला होता. यानंतर त्यांच्या फुप्फुसातील संसर्ग वाढला होता. तातडीने त्यांना मेंदाता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी दुपारनंतर त्यांची तब्येत अचानकच बिघडली. याबाबत मुलायम सिंह यांनाही कळवण्यात आलं. ते पत्नीला पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. काही वेळानंतर पत्नीने शेवटचा श्वास घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.