जगातील सर्वात लांब रोपवेचं स्वप्न साकार करण्यासाठी उत्तराखंड सरकारनं जोरदार काम सुरू केलं आहे. कारण आता समुद्रसपाटीपासून 11,500 फूट उंचीवर उत्तराखंडच्या चार धामांपैकी एक असलेल्या केदारनाथ धाममध्ये 11.5 किमी लांबीचा रोपवे बांधला जाणार आहे. हा रोपवे यात्रेकरूंसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल आणि ज्या यात्रेसाठी यात्रेकरू जवळपास संपूर्ण दिवस घालवायचे ते आता केवळ एका तासात पूर्ण करता येणार आहे.
सध्या भाविकांना गौरीकुंड ते केदारनाथ धाम असा 16 किमीचा प्रवास करावा लागतो, ज्यासाठी संपूर्ण दिवस जातो, मात्र सोनप्रयाग ते केदारनाथ असा रोपवे बांधण्यात आल्याने हा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे.
या रोपवेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथ भेटीदरम्यान केदारनाथ आणि हेमकुंड साहिबमध्ये लवकरच रोपवेचं काम सुरू होईल, असं सांगण्यात येत होतं. आता याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
उत्तराखंडचे पर्यटन सचिव दिलीप जवळकर यांचा हवाला देत एका अहवालात असं म्हटलं आहे की, केदारनाथ रोपवे प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कसरत सुरू झाली असून लवकरच निविदा काढल्या जातील.
या रोपवेबाबत पूर्वी गौरीकुंड ते केदारनाथ मंदिरापर्यंत हा प्रकल्प बांधण्यात यावा अशी योजना होती, परंतु अहवालानुसार नंतर हा प्रकल्प गौरीकुंडऐवजी सोनप्रयाग येथून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना त्याचा लाभ घेता येईल. .
धामकडे जाण्यासाठी 16 किमीचा ट्रेकिंग मार्ग गौरीकुंडपासून सुरू होतो तर सोनप्रयाग ते गौरीकुंड हे अंतर वाहनानं 8 किमी आहे. एकूण, सोनप्रयाग ते धाम, सुमारे 25 किलोमीटर पायी किंवा वाहनाने जावं लागतं.
सध्या जगातील सर्वात लांब रोपवे मेक्सिको सिटीमध्ये आहे, ज्याला केबल बस 2 म्हणून ओळखलं जातं आणि त्याची लांबी 10.55 किमी आहे. केदारनाथ रोपवे प्रकल्पानुसार तयार होईल तेव्हा तो सुमारे 1 किमी लांबीचा असेल.