जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक...कोर्टात स्फोट करणारा आरोपी DRDO शास्त्रज्ञ प्यायला HARPIC!

धक्कादायक...कोर्टात स्फोट करणारा आरोपी DRDO शास्त्रज्ञ प्यायला HARPIC!

धक्कादायक...कोर्टात स्फोट करणारा आरोपी DRDO शास्त्रज्ञ प्यायला HARPIC!

दिल्लीतील रोहिणी कोर्टात स्फोट (Rohini Court Blast Case) करणारा आरोपी हार्पिक प्यायल्याची बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 डिसेंबर: दिल्लीतील रोहिणी कोर्टात स्फोट (Rohini Court Blast Case) करणारा आरोपी हार्पिक प्यायल्याची बातमी समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रोहिणी कोर्ट स्फोट प्रकरणात (Rohini Court blast case) दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या DRDO च्या शास्त्रज्ञानं (DRDO scientist) दावा केला आहे की, तो हार्पिक प्यायला होता. या दाव्यानंतर दिल्ली पोलिसांचं टेन्शन वाढलं आहे. शास्त्रज्ञ काही प्यायला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शास्त्रज्ञाला आधी दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आता त्याला एम्समध्ये हलवण्यात आले आहे. शास्त्रज्ञांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीदरम्यान शास्त्रज्ञ करतोय दिशाभूल : पोलीस पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शास्त्रज्ञ चौकशीदरम्यान पोलिसांची सतत दिशाभूल करत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवून वकिलाच्या पेहरावात तो एकटाच आहेस, असे सांगितलं. तुम्हीच आहात ना? यावर शास्त्रज्ञ म्हणाला की, मी तिथे आलो आहे असे दिसते. त्याचवेळी पोलिसांनी स्फोटानंतर कुठे गेला होतास, असे विचारले असता शास्त्रज्ञ म्हणाला की, मला काहीच आठवत नाही. हेही वाचा-  काय सांगता! महेंद्रसिंह धोनी नाही तर वीरेंद्र सेहवाग होता CSK ची पहिली चॉईस   शास्त्रज्ञाने रोहिणी कोर्टात हा स्फोट पूर्ण तयारीनिशी केल्याचं दिसतं, अटक झाल्यानंतर काय करायचे, याचीही तयारी त्यांनी केली होती, असे पोलिसांचे म्हणणं आहे. 9 डिसेंबर रोजी कोर्टात झाला होता स्फोट 9 डिसेंबर रोजी दिल्लीतील रोहिणी कोर्टात कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता. सकाळी 10.40 च्या सुमारास हा स्फोट झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले होते. मात्र, या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शनिवारी डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञाला अटक केली. सुरुवातीला हा स्फोट दहशतवादी कारस्थान मानला जात होता. सध्याच्या तपासात हा शास्त्रज्ञ एकटाच असल्याचं समोर आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात