मराठी बातम्या /बातम्या /देश /

नियतीही कठोर झाली! देवदर्शनावरून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात, चिमुकला वाचला पण...

नियतीही कठोर झाली! देवदर्शनावरून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात, चिमुकला वाचला पण...

देवदर्शन घेऊन येणाऱ्या कुटुंबावर काळानं घात केला. या अपघातात एकटा ८ वर्षांचा चिमुकला वाचला.

देवदर्शन घेऊन येणाऱ्या कुटुंबावर काळानं घात केला. या अपघातात एकटा ८ वर्षांचा चिमुकला वाचला.

देवदर्शन घेऊन येणाऱ्या कुटुंबावर काळानं घात केला. या अपघातात एकटा ८ वर्षांचा चिमुकला वाचला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

बाडमेर : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शन घेऊन येणाऱ्या कुटुंबावर काळानं घात केला. या अपघातात एकटा ८ वर्षांचा चिमुकला वाचला. हे शाप की वरदान अशी अवस्था त्याची झाली आहे. अख्ख कुटुंब गेलं मात्र त्याचा जीव वाचला. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील सिणधरी भागात घडली आहे.

हायवेवर झालेल्या भीषण अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील 3 महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले सगळे गुजरातचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. बाडमेरमध्ये जसोल इथे राणी भटियानीचं दर्शन घेऊन कुटुंब गुजरातला निघालं होतं.

त्यावेळी भरधाव कार एका ट्रकला धडकली. या अपघातात 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात 8 वर्षीय चिमुकल्याचा जीव वाचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी बाडमेर जिल्ह्यातील सिंधरी आणि आरजीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

गुजरातमधील धानेरा येथील पाच जण जसोल राणी भटियानी मातेच्या दर्शनासाठी कारमधून येत होते. दर्शन घेऊन ते परत घरी जात असताना त्यांची कार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. ८ वर्षांचा चिमुकल्याच्या जीवाचा धोका आता टळला आहे.

अपघातानंतर ट्रक चालक फरार असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामागचं अजून कारण समजू शकलं नाही. पोलिसांकडून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

First published:

Tags: Accident, Gujrat, Rajsthan