जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोना होऊन गेलेल्यांना मानसिक आजारासह या गंभीर समस्यांचा धोका; चिंता वाढवणारी माहिती समोर

कोरोना होऊन गेलेल्यांना मानसिक आजारासह या गंभीर समस्यांचा धोका; चिंता वाढवणारी माहिती समोर

कोरोना होऊन गेलेल्यांना मानसिक आजारासह या गंभीर समस्यांचा धोका; चिंता वाढवणारी माहिती समोर

कोविड-19चा (Covid 19) संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींना पुढच्या दोन वर्षांपर्यंत (Psychosis) सायकॉसिस, डिमेन्शिया, ब्रेन फॉग, सीझर्स असे मज्जासंस्थेशी आणि मानसिक आरोग्याशी निगडित आजार होण्याचा धोका मोठा आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 18 ऑगस्ट : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना (Corona Pandemic) संसर्गाने आता थोडं आवरतं घेतलं असल्याचं दिसत असलं, तरीही तो पूर्णपणे आटोक्यात आलेला नाहीये. त्यातच ज्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे, त्यांना लाँग कोविडसह (Long Covid) अन्यही काही आजारांचा त्रास होण्याचा धोका असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे. कोविड-19 चा संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींना (Neurological) मज्जासंस्थेशी निगडित, तसंच मानसिक आरोग्याशी (Psychiatric) संबंधित काही आजार होण्याचा धोका दोन वर्षांपर्यंत जास्त असतो, असं ‘दी लॅन्सेट सायकिअ‍ॅट्री’ या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात म्हटलं आहे. कोविड-19 होऊन गेलेल्या सुमारे साडेबारा लाखांहून अधिक रुग्णांच्या आरोग्यविषयक नोंदींचं निरीक्षण करून हा अभ्यास करण्यात आला आहे. श्वसनमार्गाच्या अन्य कोणत्याही संसर्गाच्या तुलनेत कोविड-19चा संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तींना पुढच्या दोन वर्षांपर्यंत (Psychosis) सायकॉसिस, डिमेन्शिया, ब्रेन फॉग, सीझर्स असे मज्जासंस्थेशी आणि मानसिक आरोग्याशी निगडित आजार होण्याचा धोका मोठा असल्याचं त्यात म्हटलं आहे. कोविड-19च्या साथीच्या सुरुवातीपासूनच संबंधित रुग्णांना अशा आजारांना सामोरं जावं लागल्याच्या अनेक घटना दिसून आल्या आहेत. या संशोधक गटाने या आधी केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं होतं, की कोरोना संसर्गानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत मज्जासंस्थेशी आणि मानसिक आरोग्याशी निगडित आजार होण्याचा धोका जास्त आहे. Corona Update: ओमिक्रॉनच्या सेंटॉरस सब-व्हेरिएंटचा 20 देशांमध्ये प्रसार, किती धोकादायक आहे हा व्हायरस? आताच्या अभ्यासात असं आढळून आलं आहे, की कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या प्रौढांना Anxiety आणि डिप्रेशनचा त्रास होण्याचा धोका मोठा आहे; मात्र हा धोका संसर्गानंतर दोन महिन्यांनंतर कमी होतो. लहान मुलांमध्ये कोरोना होऊन गेल्यानंतर Seizures आणि काही Psychotic Disorders उद्भवण्याचा धोका आढळला; मात्र त्याची शक्यता प्रौढांच्या तुलनेत कमी असल्याचंही आढळलं. तसंच, कोविडनंतर मज्जासंस्थेशी निगडित आणि मानसिक विकार होण्याची शक्यता प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये कमी असल्याचंही आढळलं. श्वसनमार्गाचे अन्य काही विकार असलेल्या मुलांना मात्र काही प्रमाणात त्रास होऊ शकतो, असंही आढळलं आहे. कोरोना होऊन गेल्यानंतर दोन वर्षं किंवा त्याहून अधिक काळात 10 हजार मुलांपैकी 260 जणांना Seizures, तर 10 हजार मुलांपैकी 18 जणांना Psychotic Disorders झाल्याचं आढळून आलं. याबद्दल अधिक नोंदी आणि संशोधन आवश्यक असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. तरीही अल्फा व्हॅरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हॅरिएंटचा आणि ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्यांना असे आजार होण्याचा धोका जास्त असल्याचं आढळून आल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. कोविड-19चा संसर्ग होऊन गेल्यानंतर मुलांना असलेल्या न्यूरॉलॉजिकल आणि मानसिक आरोग्याशी निगडित आजारांच्या धोक्याचा वेध घेणारा हा आतापर्यंतचा पहिला व्यापक पातळीवरचा अभ्यास असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच, नव्या व्हॅरिएंट्समुळे (New Variants) धोक्याच्या प्रमाणात कसा बदल होतो, याचं मूल्यमापनही यात करण्यात आलं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधले प्राध्यापक पॉल हॅरिसन (Pro. Paul Harrison) यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. ते म्हणतात, ‘कोविड संसर्गानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत मज्जासंस्थेशी निगडित आणि मानसिक आजार होण्याचा धोका जास्त असू शकतो, या आधीच्या संशोधनातल्या निष्कर्षावर या अभ्यासात शिक्कामोर्तब झालंच. शिवाय हा धोका पुढे दोन वर्षांपर्यंत राहू शकतो, असं या अभ्यासात दिसून आलं. हे संशोधन महत्त्वाचं आहे. कारण आता कोरोनाची साथ आटोक्यात आली असली, तरी हे धोके रुग्णांनी आणि आरोग्य सेवांनी लक्षात घ्यायला हवेत.’ कोरोनाचे पुन्हा भयानक रूप! रूग्णालयांमध्ये संक्रमितांची संख्या वाढतेय, दिल्लीत दररोज 8 ते 10 मृत्यू कोविड-19नंतर (Covid-19) असं का होतं, हे समजून घेण्यासाठी, तसंच त्याला प्रतिबंध करण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी काय करता येईल, हे लक्षात येण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचं हॅरिसन म्हणतात. - हा अभ्यास कसा करण्यात आला? प्रामुख्याने अमेरिकेतल्या रुग्णांच्या दोन वर्षांहून अधिक काळातल्या इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्सचं विश्लेषण करून 14 प्रकारच्या न्यूरॉलॉजिकल आणि सायकिअ‍ॅट्रिक निदानांचा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेतल्या TriNetX network मधल्या हेल्थ रेकॉर्ड्सपैकी 12.84 लाख व्यक्तींना 20 जानेवारी 2020 किंवा त्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला होता. या व्यक्तींचा अभ्यासात समावेश करण्यात आला होता. 18 वर्षांखालच्या 1.85 लाख, 18 ते 64 वयोगटातल्या 8.56 लाख, तर 65 वर्षांवरच्या 2.42 लाख जणांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. या सर्व कोरोना रुग्णांची तुलना श्वसनमार्गाचा अन्य संसर्ग असलेल्यांशी करण्यात आली. कोरोना संसर्गाच्या वेगवेगळ्या लाटांमधल्या रुग्णांचा डेटाही त्यात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे (Alpha) अल्फा, (Delta) डेल्टा, ओमिक्रॉन (Omicron) या व्हॅरिएंट्सच्या संसर्गानंतर नेमका कोणता परिणाम होतो, हे अभ्यासण्यात आलं. तसंच, ज्या व्हॅरिएंटची लाट होती, त्या व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या माहितीची तुलना त्या आधीच्या लाटेतल्या व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या माहितीशी करण्यात आली.

    अल्फा व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या 47,675, डेल्टा व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या 44,835 आणि ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या 39,845 रुग्णांचा या अभ्यासात समावेश होता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात