जाहिरात
मराठी बातम्या / देश / Covid नंतरचा काळ भारतासाठी भरभराटीचा, पण आता दुर्लक्ष नको - मुकेश अंबानी

Covid नंतरचा काळ भारतासाठी भरभराटीचा, पण आता दुर्लक्ष नको - मुकेश अंबानी

Covid नंतरचा काळ भारतासाठी भरभराटीचा, पण आता दुर्लक्ष नको - मुकेश अंबानी

‘Covid विरुद्धच्या लढाईमध्ये आपण अखेरच्या टप्प्यावर आहोत. आता बेफिकीर राहून चालणार नाही. तरच पुढच्या काही वर्षांत भारत आर्थिक महासत्ता बनू शकेल’, असं अंबानी यांनी PDPU च्या Convocation समारंभात सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 21 नोव्हेंबर : “भारतापुढे आता एकाच वेळी दोन मोठी लक्ष्य आहेत. एक तर आपला देश आर्थिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहात आहे आणि त्याच वेळी ते स्वप्न पर्यावरणपूरक उर्जेतून (Green Energey) साध्य करायचं लक्ष्य आपण ठरवलं आहे. Covid-19 चं संकट यशस्वीपणे परतवून लावल्यानंतर आपण हे दुहेरी लक्ष्यसुद्धा निश्चित साध्य करू”, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) चेअरपर्सन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. भारताचं पेट्रोलियम विद्यापीठ म्हणून नावाजल्या गेलेल्या पंडित दीनदयाळ पेट्रोलियन युनिव्हर्सिटीच्या आठव्या पदवीप्रदान (Convocation of PDPU) समारंभात अंबानी बोलत होते. PDPU चा पदवीप्रदान सोहळा कोरोनाच्या (Coronavirus) संकटामुळे ऑनलाइन (Virtual address) पार पडला. व्हर्च्युअल पद्धतीने केलेल्या या बीजभाषणात अंबानी यांनी Covid-19 च्या संकटाचाही उल्लेख केला. अहमदाबादसह गुजरातमधल्या मोठ्या शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने रात्रीसाठी संचारबंदी (Night Curfew) लागू केला आहे. “कोविड विरुद्धच्या लढाईमध्ये आपण अखेरच्या टप्प्यावर आहोत. आता बेफिकीर राहून चालणार नाही. कोविज नंतरचा काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी भरभराटीचा आणि वेगाने विकासाचा ठरणार आहे, हे स्पष्ट आहे. आणखी दोन दशकात भारत जगातल्या टॉप 3 इकॉनॉमींपैकी एक होईल”, असं अंबानी म्हणाले.

कोविड काळातही आपण उज्ज्वल भविष्याकडे पाहिलं पाहिजे. मोदींच्या स्वप्नातल्या आत्मनिर्भर भारताची सुरुवात अगोदरच झालेली आहे. हे आपलं विद्यापीठ PDPU म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या मोदींच्या व्हिजनचाच भाग आहे, असंही अंबानी यांनी सांगितलं. मुकेश अंबानी हे दीनदयाळ पेट्रोलियम युनिव्हर्सिटीचे अध्यक्षसुद्धा आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात