मुंबई, 12 जानेवारी : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) रोजगार, व्यवसायावर वाईट परिणाम झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. अशातच महागाईने (Inflation Rate) कंबरडे मोडल्याने सामान्य माणूस आता दुहेरी संकटात सापडला आहे. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या रेशनच्या बिलात सातत्याने वाढ होत आहे. खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. राहिलेला कसूर पेट्रोल-डिझेलची दरवाढ पूर्ण करत आहे. यामुळे डिसेंबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.59% वर पोहोचला आहे. हा आकडा भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या महागाई दराच्या कमाल मर्यादेच्या अगदी जवळ आहे.
खाद्यतेल 24 टक्क्यांनी महागले
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने बुधवारी किरकोळ महागाई दर (Retail Inflation Rate December 2021) डिसेंबर 2021 ची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार अन्नधान्य आणि रेशनच्या किमती वाढल्याने महागाई वाढली आहे. त्यानुसार डिसेंबर 2020 च्या तुलनेत डिसेंबर 2021 मध्ये खाद्यतेलामध्ये 24.32% वाढ झाली आहे. तर इंधन आणि विजेच्या महागाई दरात 10.95% वाढ झाली आहे.
मोठी मागणी असणाऱ्या या प्रोडक्टचा करा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई
सलग तिसऱ्या महिन्यात महागाई वाढली
यापूर्वी, नोव्हेंबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 4.91% होता, ऑक्टोबरमध्ये 4.48% होता. तर सप्टेंबर 2021 मध्ये ऑगस्ट 2021 च्या तुलनेत तो 4.35% पर्यंत खाली आला होता. ऑगस्ट 2021 मध्ये हा आकडा 5.3% होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महागाई दर 4% चे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये 2% वर आणि खाली जाणारा फरक ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारे डिसेंबर 2021 चा किरकोळ चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या कमाल मर्यादेच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तर महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये 9 वेळा कोणताही बदल केलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.