मुंबई, 27 ऑक्टोबर : भारतीय रिझर्व्ह बँकेकडे असलेलं सोनं विकल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसात पसरल्या होत्या. त्यावर रिझर्व बँकेनं स्पष्टीकरण दिलं असून या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँक त्याच्याकडे असलेल्या सोन्याची विक्री करणार नसल्याचं सांगत बातमी फेटाळून लावली. तसेच जुलैपासून रिझर्व्ह बँकेनं 1.15 अब्ज डॉ़लरच्या सोन्याची विक्री केली नसल्याचेही सांगितले. गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेनं सोन्याची विक्री केली आहे. त्याचबरोबर जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर गेल्या दोन महिन्यात सोन्याची विक्री झाल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं. त्यावर रिझर्व्ह बँकेनं ट्विट करून माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँक सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याच्या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र आरबीआयकडून अशा प्रकारे सोन्याची विक्री किंवा व्यापार करण्यात आलेला नाही असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं. प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार रिझर्व्ह बँकेकडे ऑगस्ट अखेर 19.87 दशलक्ष औंस कोटी सोनं होतं. तर 11 ऑक्टोबरला 26.7 अब्ज डॉलर सोने होते असं म्हटलं होतं. त्याचबरोबर जुलैपासून रिझर्व्ह बँकेनं 5.1 अब्ज डॉलर सोन्याची खरेदी केली असून 1.15 अब्ज डॉलर सोनं विकलं असंही बातम्यांमध्ये म्हटलं होतं. पण रिझर्व्ह बँकेने हे वृत्त फेटाळून लावत या अफवा आहेत असं सांगितलं. जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं राखीव निधीतील 1.76 लाख कोटींची रक्कम केंद्र सरकारला दिली होती. सध्या सरकारच्या महसुलात घट झाली आहे. यामुळे वित्तीय तूट वाढू नये ती रोखण्यासाठी सरकारने रिझर्व्ह बँकेकडे लाभांश मिळावा अशी मागणी केली होती. त्यातच सोने विक्रीला काढलं असल्याच्या अफवा पसरल्या. त्यानंतर लगेच रिझर्व्ह बँकेनं असं काही नसल्याचे सांगत सोने विक्रीचे वृत्त फेटाळून लावले. VIDEO : अमरावतीमध्ये तुफान राडा, रवी राणा-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमनेसामने
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.