जाहिरात
मराठी बातम्या / देश / PM Narendra Modi : परदेश दौऱ्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असलेली ‘ती’ महिला कोण?

PM Narendra Modi : परदेश दौऱ्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असलेली ‘ती’ महिला कोण?

पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यात एक महिला नेहमी सोबत असते. या महिलेबद्दल अनेकांना माहिती नाही.

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 11 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांविषयी खूप चर्चा होते. कारण भारताचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी, विकासाबाबतचे करार करण्यासाठी परदेशात अनेक दौरे केले. या दौऱ्यांमध्ये पंतप्रधानांसोबत कायमच काही व्यक्ती असतात. एक महिलाही त्यांच्या या ताफ्यात असते. त्या महिलेचं नाव आहे गुरदीपकौर चावला; मात्र ती महिला नेमकी कोण आहे आणि प्रत्येक दौऱ्यामध्ये त्या पंतप्रधानांसोबत का असतात, हे जाणून घेतलं तर आश्चर्य वाटेल. ‘डीएनए’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. कोण आहे ती महिला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवेळी त्यांच्यासोबत नेहमी असलेल्या व्यक्तींमध्ये गुरदीपकौर चावला यांचा समावेश होतो. गुरदीप या अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमधल्या यशस्वी उद्योजक आहेत; मात्र केवळ हीच त्यांची ओळख नाही, तर पंतप्रधान मोदी यांची भाषणं अनेक महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या एक दुवा आहेत. अतिशय उत्तम दुभाषी असलेल्या गुरदीप पंतप्रधानांच्या भाषणाचं भाषांतर करून त्या त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवतात. सध्या त्या अमेरिकेत असल्या, तरी त्या भारतीय असून त्यांचं शिक्षणही भारतातच झालंय. सेंट दिल्लीच्या स्टीफन्स महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात बीए ऑनर्स आणि एमए या पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. त्याशिवाय पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स पदवी मिळवून त्या पीएचडी झालेल्या आहेत. भारतीय संसदेकडून त्यांना प्रशिक्षण मिळालेलं आहे. त्याशिवाय कॅलिफोर्नियातलं ज्युडिशिअल कौन्सिल आणि अमेरिका स्टेट डिपार्टमेंटकडूनही त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. भारतीय भाषा सेवा, एलएलपी या संस्थेच्या त्या संचालिका आहेत. मोठमोठ्या अधिकाऱ्यांसाठी, तसंच कॉर्पोरेट क्षेत्रासाठी त्यांची कंपनी भाषांतर आणि दुभाषी सेवा पुरवते. या क्षेत्रामध्ये गुरदीप यांना 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. पंतप्रधान मोदी यांची भाषणं हिंदीतून इंग्रजी भाषेत भाषांतरित करण्याचं काम त्यांच्याकडे असतं. आजपर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या भेटींवेळी गुरदीप कौर पंतप्रधानांसोबत होत्या. बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प किंवा सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबतच्या पंतप्रधानांच्या प्रत्येक भेटीवेळी गुरदीप मोदी यांच्यासोबत होत्या. वाचा - शरद पवारांचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा थेट पंतप्रधान मोदींना खोचक सवाल, म्हणाले… भारतीय संसदेत 1990 मध्ये गुरदीप यांनी अवघ्या 21व्या वर्षीच दुभाषी म्हणून करिअर सुरू केलं. त्यानंतर 1996मध्ये त्यांच्या पतीची अमेरिकेत बदली झाल्यामुळे त्याही अमेरिकेत गेल्या आणि तिथेच त्यांचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 2010 मध्ये पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले होते, त्या वेळी त्यांनी गुरदीपकौर चावला यांनाही आमंत्रण दिलं होतं. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना ओबामा भेटणार होते. 2015 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बराक ओबामा यांनी केलेल्या भाषणावेळीही त्यांनी दुभाषी म्हणून काम केलं. सध्याच्या घडीला अमेरिका, कॅनडा व भारत यांच्यातल्या सर्व हाय प्रोफाइल राजकीय बैठकांवेळी गुरदीप उपस्थित असतात. गुरदीपकौर चावला या अनेक राजकीय नेत्यांचा आवाज बनल्या आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, जस्टिन ट्रूडो यांचा समावेश होतो. या नेत्यांची भाषणं तितक्याच प्रभावीपणे इतर भाषांमधल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या करत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: france , PM Modi
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात