नवी दिल्ली, 26 मे : नोएडाचा (Noida News) ब्लॉगर केदारनाथमध्ये आपल्या पाळीव कुत्र्यासह फिरायला आला होता. या हस्की जातीच्या कुत्र्याचं नाव नवाब त्यागी आहे. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. आता (An angry blogger wrote a letter to Modi) ब्लॉगरने पीएम मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ब्लॉगर दाम्पत्याची वकील नेहा रस्तोगीने आपल्या पत्रात लिहिलं आहे की, मंदिरात प्राण्यांना घेऊन जाण्याबाबत कोणतीही नियमावली केदारनाथ-बद्रीनाथ मंदिर प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ब्लॉगर दाम्पत्यावर कारवाई करणं म्हणजे त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन आहे. सोशल मीडियावरुन दिल्या जात आहेत धमकी… ब्लॉगर रोहन त्यागीची वकील नेहा रस्तोगीने आपल्या पत्रात लिहिलं आहे की, मंदिराच्या समितीकडून ब्लॉगस्टविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यानंतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला धमक्या दिल्या जात आहेत. मानसिक त्रास दिला जात आहे. पुढे महिला वकिलाने सांगितलं की, दाम्पत्याने मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ कुत्र्यासोबत पूजा केली होती. ते कुत्र्याला मंदिराच्या आत घेऊन गेले नाही.
मंदिर समितीचा दावा… नोएडामध्ये राहणारा ब्लॉगर रोहन त्यागी हा आपला पाळीव कुत्रा नवाबला घेऊन केदारनाथ-बद्रीनाथला गेला होता. यादरम्यान त्याने आपल्या कुत्र्याला पकडून नंदीला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बद्रीनाथ मंदिर समितीने ब्लॉगर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मंदिर समितीने दावा केला आहे की, ब्लॉगरच्या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत.