जाहिरात
मराठी बातम्या / देश / दिवाळीत Reliance देणार गिफ्ट; 5G सेवा कुठे सुरू होणार, काय फायदे मिळणार? अंबानींचा मास्टरप्लॅन

दिवाळीत Reliance देणार गिफ्ट; 5G सेवा कुठे सुरू होणार, काय फायदे मिळणार? अंबानींचा मास्टरप्लॅन

दिवाळीत Reliance देणार गिफ्ट; 5G सेवा कुठे सुरू होणार, काय फायदे मिळणार? अंबानींचा मास्टरप्लॅन

5G हा यंदाच्या AGM चा मुख्य मुद्दा होता. त्या अनुषंगाने Reliance Jio कडे असलेला 5G स्पेक्ट्रमचा पट्टा आणि गेल्या महिन्यात झालेल्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावातून कंपनीला काय प्राप्त झालं, याचा आढावा घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 29 ऑगस्ट:  रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीने आज (29 ऑगस्ट 2022) 45वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Reliance Jio AGM 2022) घेतली. त्यात कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओची 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. येत्या दिवाळीपासून जिओकडून 5G सेवा द्यायला सुरुवात होईल आणि डिसेंबर 2023पर्यंत देशातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरापर्यंत Reliance Jio 5G सेवेचं जाळं पसरेल, अशी अपेक्षा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी व्यक्त केली. 5G हा यंदाच्या AGM चा मुख्य मुद्दा होता. त्या अनुषंगाने Reliance Jio कडे असलेला 5G स्पेक्ट्रमचा पट्टा आणि गेल्या महिन्यात झालेल्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावातून कंपनीला काय प्राप्त झालं, याचा आढावा घेऊ या. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपल्यानंतर रिलायन्स जिओने जाहीर केलं, की कंपनीला भारतात आपली 5G नेटवर्क सेवा वेगवेगळे फ्रिक्वेन्सी बँड्स वापरून सुरू करण्यासाठी 5G स्पेक्ट्रम प्राप्त झाला आहे. दूरसंचार विभागाने आयोजित केलेल्या या लिलावात कंपनीला 700MHz, 800MHz, 1800MHz, 3300MHz आणि 26GHz या बँड्सचे स्पेक्ट्रम मिळाले आहेत. हे स्पेक्ट्रम 20 वर्षांकरिता वापरण्याचे हक्क मिळवण्यासाठी कंपनीला एकूण 88 हजार 78 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. Reliance AGM 2022: Jio 5G बद्दल चेअरमन आणि MD मुकेश अंबानींचं मोठं वक्तव्य; म्हणाले… जिओ कंपनीने जाहीर केल्यानुसार, 700 MHz स्पेक्ट्रम फूटप्रिंटमुळे जिओ ही संपूर्ण भारतभरात खरी 5G सेवा देणारी एकमेव कंपनी ठरेल. वेगवान स्पीड, कमी लेटन्सी आणि व्यापक कनेक्टिव्हिटी ही आपल्या कंपनीच्या 5G सेवेची वैशिष्ट्यं असतील, असं जिओ कंपनीने म्हटलं आहे. 5G स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया एक ऑगस्ट रोजी संपली. त्यात विविध दूरसंचार कंपन्यांच्या बिडिंगच्या 40 फेऱ्या झाल्या. जिओने आपल्या 4G सेवेची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर करून टेलिकॉम क्षेत्रात आघाडी घेतली आहे. 4G सेवा अधिकृतपणे सुरू केल्यानंतर सहा वर्षांमध्ये जिओ 4G ची ग्राहकसंख्या 400 दशलक्षांहून अधिक आहे. आता ही कंपनी आपल्या 5G सेवेद्वारे आणखी मोठा ठसा उमटवू इच्छित आहे. जिओने याच महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलं होतं, की कंपनीच्या सध्याच्या नेटवर्कच्या आणि फायबर नेटवर्क इकोसिस्टीमच्या साह्याने कंपनी देशात कमीत कमी काळात 5G सेवा देऊ शकेल. जिओ कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात असं म्हटलं आहे, ‘जिओ कंपनीचं 5G सोल्युशन भारतात, भारतीयांनी आणि प्रत्येक भारतीयाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित केलं आहे. जिओ कंपनी कमीत कमी वेळात 5G रोलाउटसाठी पूर्णतः तयार आहे. कारण कंपनीचं फायबर नेटवर्क देशभर सर्वत्र पसरलेलं आहे. नो लीगसी इन्फ्रास्ट्रक्चरसह ऑल-आयपी नेटवर्कही उपलब्ध असून, स्वदेशी 5G स्टॅक आणि तंत्रज्ञानाच्या इकोसिस्टीममध्ये मजबूत जागतिक पार्टनरशिप्स हीदेखील कंपनीची वैशिष्ट्यं आहेत.’ कंपनीला 5G स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले होते, ‘जागतिक दर्जाची, परवडण्यासारखी 5G सेवा आणि 5Gवर आधारित सेवा देण्यास जिओ कटिबद्ध आहे. आम्ही अशी सेवा, प्लॅटफॉर्म्स आणि सोल्युशन्स देऊ, त्यातून भारताच्या डिजिटल क्रांतीला वेग मिळेल. शिक्षण, आरोग्य, कृषी, मॅन्युफॅक्चरिंग, ई-गव्हर्नन्स अशा महत्त्वाच्या क्षेत्रांत ते उपयुक्त ठरेल. पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया मिशनसाठी आमचं हे अभिमानास्पद योगदान असेल.’ जिओ 5G स्पेक्ट्रमचे तपशील - जिओला लो बँड, मिड बँड, mmWave स्पेक्ट्रम मिळाले आहेत. त्यामुळे ग्राहक आणि बिझनेसेसना सीमलेस इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळू शकेल. डीप फायबर नेटवर्क आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या प्लॅटफॉर्म्सचा वापर त्यासाठी केला जाणार आहे. दिवाळीपूर्वी देशात लाँच होणार जिओ 5G, पहिल्या टप्प्यात मुंबईचाही समावेश, मुकेश अंबानींची घोषणा - 700MHz स्पेक्ट्रम वापरून 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरविणारी जिओ ही एकमेव टेलिकॉम कंपनी असेल. - जिओने 22 सर्कल्समध्ये 700 MHz आणि 800 MHz बँड्स खरेदी केले आहेत. - जिओ यासाठी पुढची 20 वर्षं दर वर्षी 7877 कोटी रुपये शुल्क मोजेल. यात दर वर्षी 7.2 टक्के दराने व्याज धरण्यात आलं आहे. Disclaimer: Network18 आणि News18lokmat चॅनेल/वेबसाइट ची संचालक संस्था ही एक स्वतंत्र मीडिया ट्रस्ट आहे ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात