मुंबई, 30 मार्च : रिलायन्स इंडस्ट्रीजने PM Cares या फंडासाठी 500 कोटींची मदत जाही केली आहे. Coronavirus विरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच या मदतनिधीची घोषणा करत यासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत अनेक उद्योजकांनी पुढे येऊन मदत देऊ केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून यापूर्वी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांतल्या मुख्यमंत्री निधीसाठी रिलायन्सने प्रत्येकी 5 कोटी रुपये दिले आहेत.
रिलायन्स इंडिस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी याची घोषणा करताना सांगितलं की, "भारत या महासाथीच्या संकटातून बाहेर येईल हा विश्वास आहे. संपूर्ण रिलायन्स इंडिस्ट्रीज लिमिटेडची टीम या प्रसंगी देशाबरोबर या संकटात मदत करायला हजर आहे. आमच्याकडून ही लढाई लढण्यासाठी सर्व काही मदत केली जाईल."
हे वाचा :
आता घरच्या घरी कळतील कोरोनाची लक्षणं, रिलायन्सने आणले MyJio Coronavirus Tool
याआधी कोरोनाशी लढा देण्यासाठी रिलायन्स जिओने MyJio Coronavirus Tool लॉंच केले आहे. याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी कोरोनाच्या लक्षणांची माहिती मिळवू शकता. हे टूल तुम्ही MyJio अॅपसह
Jio.comया वेबसाईटवरही वापरू शकता. यामध्ये अंतर्ज्ञानी टूलच्या मदतीने काही प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्हाला मूल्यांकन देण्यात येईल. त्यांनतर तुमच्या स्थितीचे निदान केले जाईल.
जास्ती जास्त भारतीयांना COVID-19 या डायग्नोस्टिक टूलचा लाभ घेता यावा यासाठी, जिओ ग्राहक नसलेले युझरही वेबसाईटच्या माध्यमातूनही ही सेवा वापरू शकतात. यासाठी तुम्हाला MyJio डाऊनलोड करून याचा वापर करू शकता. ही सेवा विनामुल्य असून सध्या केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच हिंदी आणि इतर भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल.
हे वाचा : आता घरच्या घरी कळतील कोरोनाची लक्षणं, रिलायन्सने आणले MyJio Coronavirus Tool मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.