मुंबई, 24 मार्च : कोरोनाचा प्रार्दुभाव भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची लक्षणे लवकर कळत नसल्यामुळे रुग्णांचा शोध घेण्यास विलंब होत आहे. यासाठी रिलायन्स जिओने MyJio Coronavirus Tool लॉंच केले आहे. याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी कोरोनाच्या लक्षणांची माहिती मिळवू शकता. हे टूल तुम्ही MyJio अॅपसह Jio.comया वेबसाईटवरही वापरू शकता. यामध्ये अंतर्ज्ञानी टूलच्या मदतीने काही प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्हाला मूल्यांकन देण्यात येईल. त्यांनतर तुमच्या स्थितीचे निदान केले जाईल.
अधिक भारतीयांना COVID-19 या डायग्नोस्टिक टूलचा लाभ घेता यावा यासाठी, जिओ ग्राहक नसलेले युझरही वेबसाईटच्या माध्यमातूनही ही सेवा वापरू शकतात. यासाठी तुम्हाला MyJio डाऊनलोड करून याचा वापर करू शकता. ही सेवा विनामुल्य असून सध्या केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच हिंदी आणि इतर भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल.
युझरनी दिलेल्या उत्तरांच्या आधारावर, जिओ कोरोनाव्हायरस टूल युझरना कमी धोका, मध्यम धोका आणि जास्त धोका असे लेबल देतील. त्याचबरोबर या संबंधित मार्गदर्शनही त्यांना देण्यात येईल.
#IndiaFightsCOVID19 | We at Jio have developed a simple tool that provides an intuitive and accessible mechanism. This tool will tell if they are at low, moderate or high risk: Kiran Thomas, Jio Director tells @Zakka_Jacob on #BrassTacks pic.twitter.com/utERtT1ErJ
— News18 (@CNNnews18) March 23, 2020
कमी धोका असलेल्या लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर मध्यम धोका असलेल्यांना घरीच आयसोलेशनमध्ये रहावे, घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, असे सांगण्यात येत आहेत. तर जास्त धोका असलेल्या लोकांनी स्थानिक प्रशासनाला यासंबंधी माहिती देऊन त्वरित आपली चाचणी करून घ्यावी. या सेवेमुळे लोकांना घरच्या घरी कोरोनाची लक्षणे समजतील. यामुळे कोरोना रुग्णांचे निदानही लवकर होईल आणि रुग्णालयांमधील गर्दीही कमी होईल.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष किरण थॉमस यांनी सीएनएन-न्यूज 18शी बोलताना, “हे उपकरण COVID-19 संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी देईल. यामुळे नागरिकांना केवळ कोरोना लक्षणाबाबत माहितीच नाही तर कोरोनाचे निदानही होईल”, असे सांगितले. तसेच, हे साधन सध्याच्या परिस्थिती बाबतही माहिती देईल. थॉमस यांनी यावेळी, “जिओ ग्राहकांच्या गोपनीयतेच्या चिंतेचा आदर करते. त्यामुळे त्यांची वैयक्तिक माहिती कुठेही जाणार नाही. ही माहिती एकत्रीतपणे असेल, वैयक्तिक नसेल. या उपकरणाच्या माध्यमातून नवा ट्रेंड उदयास येत आहेत”, असेही सांगितले.
आपण तुम्ही Google Play किंवा Appपल अॅप स्टोअर वरून MyJio अॅप डाउनलोड करून या सेवेचा लाभ घेऊन शकतात. तसेच, हे वेब ब्राउझरवरून याचा लाभ घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.