जाहिरात
मराठी बातम्या / देश / न्यूड होऊन मुलांकडून करून घेतलं होतं बॉडी पेटिंग, रेहाना फातिमाचं प्रकरणं पोहचलं सुप्रीम कोर्टात

न्यूड होऊन मुलांकडून करून घेतलं होतं बॉडी पेटिंग, रेहाना फातिमाचं प्रकरणं पोहचलं सुप्रीम कोर्टात

न्यूड होऊन मुलांकडून करून घेतलं होतं बॉडी पेटिंग, रेहाना फातिमाचं प्रकरणं पोहचलं सुप्रीम कोर्टात

फातिमाने स्वत:च्या मुलांना ‘बॉडी पेंटिंग’ करू दिलं आणि त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोट्टयम, 28 जुलै: अर्धनग्न होऊन आपल्या मुलांकडून अंगावर बॉडी पेंटिग काढलेली महिला कार्यकर्ती रेहाना फातिमावर (Rehana Fatima) गुन्हा दाखल करण्याता आला होता. या प्रकरणी फातिमानं केरळ उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली. आता रेहानं सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सेमी न्यूड व्हिडीओ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. फातिमानं मुलांसमोर अर्धनग्न होत त्यांना स्वत:च्या शरिरावर पेंटिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केरळ राज्य बाल संरक्षण हक्क आयोगाने फातिमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याआधी फातिमावर थिरुवल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सेक्शन आयटी कायद्याच्या 67 अंतर्गत (इलेक्ट्रॉनिक मार्गाने लैंगिक कंटेट प्रसिद्ध करणे) आणि जुवेनाइल जस्टिस कायद्याच्या सेक्शन 75 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात केला होता. सेमी न्यूड व्हिडीओ लगेचच सर्व समाज माध्यमांवरून काढून टाकण्यात आला होता. वाचा- लोकांपासून इतका लांब जाऊन बसला की इंटरनेटवर VIDEO भन्नाट व्हायरल

News18

वाचा- प्रियंकाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, जोनस कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण काय आहे प्रकरण? केरळच्या शबरीमालामध्ये अयप्पा मंदिर प्रवेश प्रकरणी रेहाना फातिमा सर्वप्रथम चर्चेत आली होती. त्यानंतर तिने ‘बॉडी आर्ट आणि राजकारण’ (Body Art and Politics) असं कॅप्शन देतं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तिची दोन्ही मुलं तिच्या अर्धनग्न शरिरावर पेंटिंग करत आहेत. पोस्टबाबत फातिमाचे असे म्हणणे आहे की, लैंगिकतेच्या चुकीच्या संकल्पनेविरोधात तिने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. तिने या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असं लिहिलं होतं की, ‘जेव्हा त्यांची आई डोळ्याच्या समस्येमुळे काहीसा आराम करत होती, त्यावेळी तिच्या मुलांनी तिला Cool बनवण्याठी फिनिक्स पक्षाचे पेंटिग करण्याचा निर्णय घेतला.’ सध्याच्या समाजात महिला कपड्यांमध्ये देखील सुरक्षित नाही आहेत. एखाद्या स्त्रीचे शरीर काय आहे किंवा लैंगिकता काय आहे याबाबत उघडपणे बोलले पाहिजे असे म्हणणे रेहानाने या व्हिडीओतून मांडलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात