हैदराबाद, 17 एप्रिल : गेल्या दोन वर्षांपासून लोक हँड सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून हात स्वच्छ करण्यासाठी सध्या प्रत्येकाच्या घरात सॅनिटायझर आहेच. परंतु, अलीकडच्या काळात असं दिसून आलंय की, विषाणूपासून संरक्षण करण्यासोबतच सॅनिटायझर अनेक कुटुंबांसाठी जीवघेणी परिस्थिती बनली आहे. एका अहवालानुसार, मोठ्या संख्येनं लोक आत्महत्येसाठी सॅनिटायझर पित आहेत. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, गेल्या एका वर्षात हैदराबादमध्ये किमान 80 लोकांनी हँड सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याशिवाय शहराच्या आजूबाजूच्या ठिकाणाहून आणखी 20 प्रकरणं समोर आली आहेत. हे सर्व आकडे निझाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (NIMS) चे आहेत. हे वाचा - कपड्यांशी आपलं नातं आहे 35 हजार वर्षं जुनं, जाणून घ्या कसे बनतात कपडे कारण काय आहे? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे लोकांना सॅनिटायझर मिळणं खूप सोपं झालं आहे. त्यामुळे आता मौजमजा करण्यासाठी अनेक जण दारूत सॅनिटायझर मिसळून पीत आहेत. NIMS च्या आपात्कालीन औषध विभागाच्या प्रमुख डॉ. आशिमा शर्मा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, “काही लोकांनी याचे थेट सेवन केले असले तरी, अनेक प्रकरणांमध्ये ते अल्कोहोलमध्ये मिसळण्याकडे लोकांचा कल असतो. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून सॅनिटायझरचा वापर अचानकपणे वाढला आहे. सॅनिटायझर आता सहज उपलब्ध आहेत. हे फ्लोअर क्लीनर, बाथरूम क्लीनर, जंतुनाशक तणनाशके आणि लोक वापरत असलेली कीटकनाशके यांसारखे पदार्थ आहेत. हे वाचा - 6 जणं 13 दिवस निर्जन ठिकाणी अडकले, एका बाटलीने केला चमत्कार अन् नौदलानं वाचवलं 50 टक्के सॅनिटायझर बनावट एका आकडेवारीनुसार, आजकाल बाजारात 50 टक्के सॅनिटायझर्स बनावट आहेत. तज्ज्ञांच्या मते, सॅनिटायझरच्या वापरामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये जळजळ होते. जरी रूग्ण सहसा जिवंत राहतात. तरीही ते वारंवार शस्त्रक्रिया करण्याच्या दीर्घ चक्रात प्रवेश करतात. राज्याच्या गांधी रुग्णालयातील आपात्कालीन विभागातील एका कनिष्ठ डॉक्टरने सांगितलं की, “वसतिगृहात राहणारे अनेक तरुण, जे प्रेमात अपयशी झाले आहेत किंवा परीक्षेत नापास झाले आहेत, ते सहज उपलब्ध असलेल्या कोणत्याही गोष्टीचा वापर करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.” सॅनिटायझरमुळे मृत्यू होत नसला तरी जठर आणि पचनयंत्रणा मार्ग (gastrointestinal tract) मोठ्या प्रमाणावर जळण्याच्या घटना समोर येतात. कारण बहुतेक जण सॅनिटायझरची संपूर्ण बाटली पितात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.