नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : ऑक्टोबर महिना (Reasons behind rains in October) निम्म्याहून अधिक संपला तरी देशातील अनेक राज्यांत पाऊस सुरू आहे. साधारणतः सप्टेंबर (Usually rains end in September) महिन्यानंतर पावसाळा संपतो आणि हिवाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते. मात्र ऑक्टोबर महिन्याचे तीन (rains in many parts of the country) आठवडे उलटूनही देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस असल्याचं चित्र आहे. या भागात पावसाचा धुमाकूळ पावसानं सध्या सर्वाधिक धुमाकूळ उत्तराखंडमध्ये घातला आहे. राज्यातील अनेक भागात पाणी साचलं असून अनेकांचे बळी गेले आहेत. उत्तराखंडमध्ये सध्या गंभीर पूरस्थिती असून हेलिकॉप्टरच्या मदतीने अनेकांनी सुटका करण्यात येत आहे. केरळमध्येही गेल्या आठवड्यापासून पावसानं जोर धरला आहे. त्यासोबत मध्य प्रदेश आणि बिहारमध्येदेखील ऑक्टोबर महिन्यात पावसाचं जोरदार हजेरी लावली आहे. यामागे बदलणारी भौगोलिक परिस्थिती आणि वैज्ञानिक काऱणं असल्याचं सांगितलं जात आहे. ही आहेत कारणं दरवर्षीच्या तुलनेत मान्सूनची परतीची वेळ लांबणीवर पडली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मधल्या काळात पावसाने ब्रेक घेतला होता. त्यानंतर दडी मारून बसलेला मान्सून उशीरा सक्रीय झाला. त्यामुळे त्याच्या परतीलादेखील उशीर झाल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा- उत्तराखंडमध्ये ढगफुटी; 46 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर कमी दाबाचं क्षेत्र सप्टेंबर महिन्याच्या अखेरनंतर देशातील बहुतांश भागातून मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केला होता. देशातल्या पश्चिम, मध्य आणि पूर्वेतील राज्यांमधून पावसानं माघार घेतली होती. मात्र काही राज्यांच्या परिसरात कमी दबावाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं तिथं पाऊस पडत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच उत्तराखंड, केरळ आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात गेल्या 10 दिवसांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बंगालच्या खाडीवरून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे ढगांची दाटी होत असून या भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचं सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.