मराठी बातम्या /बातम्या /देश /दुचाकी चालवण्याआधी हे नियम वाचून घ्या, मोदी सरकारने जारी केली नवी नियमावली

दुचाकी चालवण्याआधी हे नियम वाचून घ्या, मोदी सरकारने जारी केली नवी नियमावली

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी आता दुचाकीचालकांसाठी नवी नियमावली (New Guidelines for two wheeler) तयार करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 13  सप्टेंबर : रस्ते सुरक्षतेसाठी केंद्र सरकारने आणखी एक पाऊल उचलले असून नवीन नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे दुचाकीसाठी नव्या नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे. यात बाइकवर पाठीमागे बसणारी व्यक्ती आणि साहित्य ठेवण्यासाठी आदेश दिले आहे.

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी आता दुचाकीचालकांसाठी नवी नियमावली (New Guidelines for two wheeler) तयार करण्यात आली आहे.

मागील महिन्यातील नियमावलीनुसार, बाइकचालकाच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी सीट खाली पकडण्यासाठी हॅण्ड होल्डर असणे गरजेच असल्याचे सांगितले होते. जेणे करून अपघाताच्या वेळी मागील व्यक्तीला हॅण्ड होल्डरला पकडता येईल. पण, सध्या अशी कोणतीही सुविधा बाइकमध्ये देण्यात येत नाही. तसंच मागील व्यक्तीसाठी दोन्ही बाजूने फुटरेस्ट असणे गरजेचं असल्याचे सांगितले आहे.

आता नव्या नियमावलीनुसार, बाईकवर मागे जर एखादी महिला बसत असेल तर ओढणी किंवा पदर हा चाकात जावू नये यासाठी चाकाजवळील ग्रीलला प्लास्टिकचे कव्हर लावावे.

परिवहन मंत्रालयाने बाइकवर मागे छोटे कंटेनर ठेवण्यासाठी ही निर्देश दिले आहे. या कंटेनरची लांबी ही 550 मिमी, रुंदी 510 मिमी आणि उंची 500 मिमीपेक्षा मोठी असता कामा नये. जर मागील सीटवर हे कंटेनर लावले असेल तर फक्त चालकालाच दुचाकी चालवण्याची परवानगी दिली. म्हणजे आता दुसऱ्या व्यक्तीला अशा बाइकवर प्रवास करण्यास मनाई आहे.

त्याचबरोबर केंद्र सरकारने दुचाकीच्या टायरांबद्दलही नवीन नियम जारी केले आहे. त्यानुसार, जर बाईकचे वजन हे  3.5 टन असेल तर अशा वाहनात टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम लावावे लागणार आहे. यामुळे चालकाला टायरमध्ये किती हवा आहे, टायराची काय परिस्थिती आहे, याची माहिती मिळेल. बऱ्याच वेळा भरधाव वेगात टायर फुटल्यामुळे अपघात घडतात. यात हकनाक लोकांचा जीव जातो. त्यामुळे नव्या नियमावलीत टायर प्रेशन मॉनिटरिंग सिस्टम लावणे अनिवार्य असणार आहे.

First published: