मुंबई, 4 मे : मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी दिलेल्या अल्टीमेटमला काही तास बाकी असताना राज ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, औरंगाबादच्या सभेवरुन राज ठाकरेंना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस आहे. खासदार, आमदार राणा दाम्पत्याच्या जामीनावर निर्णय येण्याची शक्यता आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर राजस्थान राज्यातील जोधपूरमध्ये जातीय तणाव निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदी डेन्मार्कच्या दौऱ्यावर. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर.
राज ठाकरे भूमिकेवर ठाम
मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी दिलेल्या अल्टीमेटमला काही तास बाकी असताना राज ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. 'आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच' असं म्हणत राज ठाकरे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
राज ठाकरेंना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मुंबईत पोलिसांनी (mumbai police) राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेबाबत (Aurangabad Rally) आता राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर 'सामान्य व्यक्तीला या गोष्टींकडून त्रास होत असेल आणि कायदा कोण हातात घेत असेल तर त्या पद्धतीने कारवाई ही होणारच' असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhu Raje Desai ) यांनी स्पष्ट केलं आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
राणा दाम्पत्याच्या जामीनावर निर्णय
खासदार, आमदार राणा दाम्पत्याच्या जामीनावर निर्णय येण्याची शक्यता आहे. विशेष न्यायाधीश आर एन रोकडे यांनी सोमवारी निर्णय राखून ठेवला होता. परंतु, न्यायालय इतर प्रकरणांमध्ये व्यस्त असल्याने आणि श्रुतलेख (राणांच्या जामीन आदेशाचे) पूर्ण न झाल्यामुळे आदेश दिला जाऊ शकला नाही.
राज्यात बाहेरून गुंड आणून मुंबईत गडबड करण्याचा डाव, संजय राऊतांचा गंभीर आरोप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेला (Aurangabad Rally) पोलिसांनी अटी-शर्थींसह परवानगी दिली होती. त्यानुसार औरंगाबाद पोलिसांचं राज ठाकरेंच्या सभेकडे आणि त्यांच्या भाषणावर करडी नजर होती. या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी एक अहवाल तयार केला होता आणि तो अहवाल पोलीस महासंचालकांना (Maharashtra DGP) पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
जोधपूरमध्ये तणाव
राजस्थान राज्यातील जोधपूरमध्ये जातीय तणाव निर्माण होऊन दगडफेक झाली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेत पाच पोलीस जखमी झाले. मोठा पोलिस बंदोबस्त ठेवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
राहुल गांधींसोबत पबमध्ये दिसलेली तरुणी कोण?
नेपाळमध्ये लग्नसोहळ्यासाठी गेलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल (Rahul Gandhi Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पबमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्याचवेळी, पबमध्ये त्यांच्यासोबत व्हिडिओमध्ये दिसणारी महिला नेपाळमधील चीनची राजदूत (Chinese Ambassador To Nepal) असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा
जर्मनी भेटीची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या तीन देशांच्या युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यावर मंगळवारी डेन्मार्कला पोहोचले. विमानतळावर डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी त्यांचे स्वागत केले. डेन्मार्कला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्या कोपनहेगन येथील निवासस्थानाचा खाजगी दौरा केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.