मुंबई, 12 एप्रिल : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेकडे आज राज्याचं लक्ष लागून आहे. विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस नेत्याच्या मुलावर बलात्काराचे आरोप करण्यात आले असून गुन्हा दाखल झाला आहे. याविरोधात भाजप आक्रमक झालीय. कर्नाटकात आता नवीन वाद निर्माण झालाय. इसिसकडून भारतीय तरुणांचे ब्रेन वॉश केलं जात असल्याचं समोर आलं आहे. यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या अगदी काही मिनिटांत.
राज ठाकरेंच्या उत्तर सभेकडे राज्याचं लक्ष
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीसमोर हनुमान चालिसा लावा असा आदेश दिला होता. यानंतर सर्वच थरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेचे नेतेही अडचणीत आले होते. त्यानंतर आता आज (12 एप्रिल) ठाणे येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे पूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
अखेर राज्यावर भारनियमाचं संकट ओढावलं
राज्यातील जनतेला आता भारनियमाचा (Load Shedding) सामना करावा लागणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे. त्यासंदर्भात महावितरणने स्वत: माहिती दिली आहे. विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून (Mahavitaran) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेची वाढती मागणी व कोळश्या अभावी अपुऱ्या वीज निर्मितीमुळे सुमारे 2500 ते 3000 मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार आहे. (Maharashtra load shedding latest news updates)
एसटी कर्मचाऱ्यांची (ST Workers) कोर्टात भूमिका मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.
विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सोमय्या पिता-पुत्रांना मोठा झटका
महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) हे आता अडचणीत येताना दिसत आहेत. किरीट सोमय्यांनी INS विक्रांत (INS Vikrant) युद्धनौकेचा निधी लाटल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात माजी सैनिकाने तक्रार देखील केली आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि निल सोमय्या (Niel Somaiya) या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत सकाळी पाणी या विषयावरील परीषदेला उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9 वाजता बीजे हॅाल विले पार्ले येथे कार्यक्रमाची सुरुवात होईल.
केंद्रीय महिला आणि बाल विकासमंत्री श्रीमती स्मृती इराणी मुंबईत पश्चिम विभागातील 6 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या विभागीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार.
ISIS कडून भारतीय तरुणांचे ब्रेन वॉश
ISIS भारतीय सायबर स्पेसमध्ये प्रचार साहित्य पसरवत असल्याचं NIA तपासात समोर आलं आहे. एनआयएने हे साहित्य बनवण्यात गुंतलेल्या स्लीपर सेल उघडकीस आणून अनेकांना अटक केली होती. मात्र, तरीही हे साहित्य सायबर स्पेसवर फिरत आहे. व्हॉईस ऑफ हिंदची नवीन आवृत्ती डार्कनेटवर उपलब्ध आहे. ISIS प्रो सोशल मीडिया हाताळणारी ISIS आता मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या नावावर भारतीय तरुणांचे ब्रेन वॉश करत आहे.
युक्रेन संघर्षावर पंतप्रधान मोदींची बायडेन यांच्याशी बैठक
युक्रेन संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी आभासी बैठक घेतली. युक्रेनमधील चिंताजनक परिस्थितीचे वर्णन करताना, पंतप्रधान मोदींनी बायडेन यांना भारताच्या निर्वासन मोहिमेची माहिती दिली ज्या अंतर्गत 20,000 हून अधिक भारतीय नागरिकांना युद्धग्रस्त देशातून परत आणण्यात आले.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्याच्या मुलावर बलात्काराचे आरोप
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्याच्या मुलाने आणि इतरांनी सामूहिक बलात्कार केल्यामुळे एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीलंका अर्थव्यवस्था संकट
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी अभूतपूर्व आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असलेल्या लोकांना आश्वासन दिले की त्यांचे सरकार त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी चोवीस तास काम करत आहे. आंदोलकांना त्यांचे आंदोलन थांबवावने. रस्त्यावर घालवलेला प्रत्येक मिनिट देशाचं आणखी नुकसान करतोय.
पाकिस्तानात शरीफ राज
शेहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी शपथविधीच्या काही तास आधी राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाऊंटनुसार, अस्वस्थ असल्याचे सांगितल्याने सिनेटचे अध्यक्ष सादिक संजारानी यांनी त्यांना शपथ दिली. पीटीआयचे उमेदवार शाह महमूद कुरेशी यांच्या विरोधात शेहबाज यांना 174 मते मिळाली, ज्यांना त्यांच्या पक्षाने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यावर कोणतीही मते मिळाली नाहीत.
कर्नाटक भाजप प्रचार
कर्नाटकात भाजप आजपासून निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे. 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटना मजबूत करण्यासाठी भाजप नेते राज्यातील 10 वेगवेगळ्या विभागात 10 दिवस घालवतील. कर्नाटकच्या विविध भागांत फिरून मैदानी परिस्थिती आणि निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
इतर महत्वाच्या घडामोडी
झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील बाबा बैद्यनाथ मंदिराजवळ असलेल्या त्रिकुट टेकडीवर 12 रोपवे केबल कार ऐकमेकांवर आदळल्याने एकाचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दृश्यमानतेच्या समस्येमुळे बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. रोपवेच्या घटनेमुळे देवघरमधील परिस्थितीवर पंतप्रधान सतत लक्ष ठेवून आहेत. त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बचाव कार्याबाबत चर्चा केली.
केरळमध्ये भ्रष्टाचार
RTI दाखवते की केरळचे मुख्यमंत्री आणि माजी वित्त मंत्री आणि आरोग्य मंत्री यांना 2020 मध्ये कोविड महामारीच्या काळात जास्त किंमतीत PPE किट खरेदी करण्याची माहिती होती. PPE किट आणि ग्लोव्हज मोठ्या दराने विकत घेण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
हिजाब आणि हलाल नंतर नवा वाद
हिजाब आणि हलाल नंतर, हिंदू गटांनी जंगलाच्या जमिनीवर बांधलेल्या मशिदीचा निषेध केला. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदू जागरण वेदिकेने सुलिया येथील जंगलाच्या जमिनीवर बांधलेल्या मशिदीच्या विरोधात भव्य मोर्चा काढला. सांपजे राखीव जंगलात मशीद बांधल्याचा दावा हिंदू गटाने केला आहे. न्यायालयाने 2017 मध्ये वनजमिनीतून मशीद हटवण्यास सांगितले होते. परंतु, प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता गुजरातमधील अडालज येथे श्री अन्नपूर्णधाम ट्रस्टच्या वसतिगृह आणि शिक्षण संकुलाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान जनसहायक ट्रस्टच्या हिरामणी आरोग्यधामचे भूमिपूजनही पंतप्रधान करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pravin darekar, Raj thackarey, TMC