जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO: अन् मंदिरातच महिलांसोबत किर्तन करायला बसले Prime Minister Narendra Modi

VIDEO: अन् मंदिरातच महिलांसोबत किर्तन करायला बसले Prime Minister Narendra Modi

VIDEO: अन् मंदिरातच महिलांसोबत किर्तन करायला बसले Prime Minister Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) रविदास जयंती 2022 (Sant Ravidas Jayanti 2022) निमित्त दिल्लीतील करोल बाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात पोहोचले.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) रविदास जयंती 2022 (Sant Ravidas Jayanti 2022) निमित्त दिल्लीतील करोल बाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात पोहोचले. येथे गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरात प्रार्थना केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी करोलबाग येथील श्री गुरु रविदास धाम मंदिरात आयोजित केलेल्या शब्द कीर्तनाला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरात उपस्थित महिलांमध्ये बसून मंजिरा वाजवला. संत रविदासांच्या जयंतीनिमित्त मंदिर आणि मठांमध्ये कीर्तन-भजनाचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी यात्राही काढल्या जातात. यासोबतच अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी संत रविदासांचा जन्म झाल्याचे मानले जाते. आज 16 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी होत असल्याने आजचा दिवस संत रविदासांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते.

जाहिरात

पीएम मोदी यांनी मंगळवारी सांगितलं होतं की, संत रविदासांनी जातिवाद आणि अस्पृश्यता यासारख्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलं होतं. माझ्या सरकारनं प्रत्येक पावलावर आणि योजनेत गुरु रविदासांची भावना आत्मसात केली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. रविदास जयंतीनिमित्त राहुल आणि प्रियंका गांधी आज वाराणसीला जाणार दुसरीकडे, संत गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रविदास मंदिराला भेट देणार आहेत. बुधवारी सकाळी काँग्रेस नेते गोवर्धनपूर येथे सरांना अभिवादन करतील. निवडणूक आयोगाने गुरु रविदास जयंतीनिमित्त पंजाब विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. राज्यात यापूर्वी 14 फेब्रुवारीला मतदान होणार होते. आता 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

असे म्हणतात की संत रविदास यांचा जन्म चर्मकार कुळात झाला, म्हणून ते जोडे बनवत असत. त्यांनी कोणतंही काम लहान-मोठं मानले नाही. त्यामुळे ते प्रत्येक काम पूर्ण मनाने आणि झोकून देत असत. कोणतेही काम पूर्ण शुद्ध मनाने आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे, अशा स्थितीत त्याचे फळ नेहमीच चांगले असते, असा त्यांचा विश्वास होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात