मराठी बातम्या /बातम्या /देश /Happy Birthday Ratan Tata: 84वा वाढदिवस साजरा करतायंत रतन टाटा, जाणून घ्या त्यांच्याविषयी

Happy Birthday Ratan Tata: 84वा वाढदिवस साजरा करतायंत रतन टाटा, जाणून घ्या त्यांच्याविषयी

 प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) हे आपल्या व्यवसाय कौशल्यासोबतच, दयाळू स्वभाव आणि देशप्रेमासाठी प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांचा आज 84 वा वाढदिवस.

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) हे आपल्या व्यवसाय कौशल्यासोबतच, दयाळू स्वभाव आणि देशप्रेमासाठी प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांचा आज 84 वा वाढदिवस.

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) हे आपल्या व्यवसाय कौशल्यासोबतच, दयाळू स्वभाव आणि देशप्रेमासाठी प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांचा आज 84 वा वाढदिवस.

    मुंबई, 28 डिसेंबर: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Happy Birthday Ratan Tata) हे नाव जवळपास सर्वच भारतीयांच्या परिचयाचं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) हे आपल्या व्यवसाय कौशल्यासोबतच, दयाळू स्वभाव आणि देशप्रेमासाठी प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांचा आज 84 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने आम्ही रतन टाटांबाबत काही विशेष बाबी (Ratan Tata Birthday) तुम्हाला सांगणार आहोत. नवभारतने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

    रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली गुजरात राज्यातील सुरत (Ratan Tata Birth place) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा, तर आईचे नाव सोनी टाटा होते. टाटांनी आपले उच्चशिक्षण परदेशात घेतले. न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटी ऑफ आर्किटेक्चर या विद्यापीठाचे ते विद्यार्थी आहेत. त्यानंतर लॉस अँजेलिसमधील जॉन्स अँड एमन्स या कंपनीत त्यांनी काही काळ काम केलं. पुढे 1962 मध्ये भारतात आल्यानंतर वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी टाटा ग्रुप्समध्ये (Ratan Tata Education) काम करण्यास सुरुवात केली. कित्येक कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्यांची नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडच्या संचालकपदी नेमणूक झाली. दरम्यान, 1975 मध्ये बोस्टनमधील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला.

    हे वाचा-कालिचरण महाराज अडचणीत, महात्मा गांधींबद्दल केलेलं ते वादग्रस्त वक्तव्य भोवणार

    1991 साली जे.आर.डी. टाटा हे ‘टाटा सन्स’च्या चेअरमन पदावरून निवृत्त झाले; आणि कंपनीच्या चेअरमनपदाची जबाबदारी रतन टाटांच्या खांद्यावर आली. यानंतर टाटा सन्सने जी गरूडझेप घेतली त्याला रतन टाटांची मेहनतच कारणीभूत आहे. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटाने अन्य कित्येक कंपन्यांना आपल्या ताब्यात घेतल्या. ‘टाटा टी’ या कंपनीने टेटले (Tetley) कंपनीला, ‘टाटा मोटर्स’ने जॅग्वार लँड रोव्हरला (Jaguar Land Rover), आणि ‘टाटा स्टील’ने कोरस (Corus) कंपनीला आपल्या ताब्यात घेतले आहे. 2004 साली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) शेअर बाजारात लिस्ट करण्यात आले.

    रतन टाटा एक यशस्वी उद्योजक असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची दूरदृष्टी. त्यांच्या पारखी नजरेने हेरलेल्या कित्येक स्टार्टअप्समध्ये टाटाने गुंतवणूक (Tata invested Start-ups) केली. आज याच स्टार्टअप कंपन्या युनिकॉर्न बनल्या आहेत. यामध्ये ओला, पेटीएम, कार देखो, क्योरफिट, स्नॅपडील, आबरा, क्लिमासेल, फर्स्टक्राय, अर्बन लॅडर, लेन्सकार्ट अशा कित्येक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच रतन टाटांनी त्यामध्ये गुंतवणूक (Tata Sons Investments) केली होती.

    हे वाचा-पहिल्या 'राष्ट्रीय ग्रेपलिंग रेसलिंग' स्पर्धेत नाशिकच्या बहिणींनी गाजवलं मैदान

    टाटांचे सामान्य नागरिकांसाठी विचार करणे हे त्यांना इतर उद्योजकांपासून वेगळे बनवते. कार घेणे परवडत नाही म्हणून दुचाकीवर आपल्या संपूर्ण कुटुंबाला नेणाऱ्या सामान्य माणसांसाठी 2008 साली टाटांनी जगातील सर्वात स्वस्त चारचाकी - ‘नॅनो’ (Nano Car) लाँच केली होती. याव्यतिरिक्त ते देशसेवेसाठी, आणि चॅरिटीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या देणग्या देत असतात. देशाप्रती त्यांचे असलेले प्रेम, आणि त्यांनी केलेले काम याची पावती म्हणून त्यांना 2000 साली पद्म भूषण आणि 2008 साली पद्म विभूषण हे सर्वोच्च नागरी सन्मान (Ratan Tata Awards) देण्यात आले आहेत.

    एक यशस्वी उद्योजक, एक दूरदृष्टी व्यक्ती, एक देशभक्त आणि सामान्यांप्रती आदर असणारी व्यक्ती म्हणजे रतन टाटा! त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक शुभेच्छा!

    First published:
    top videos

      Tags: Ratan tata